जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sushant Singh Suicide: सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नवी अपडेट, 'या' 8 लोकांची होणार चौकशी

Sushant Singh Suicide: सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नवी अपडेट, 'या' 8 लोकांची होणार चौकशी

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं पोलीस चौकशीमध्ये मोठा खुलासा केला आहे. तिचं म्हणण्याप्रमाणे सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती.

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं पोलीस चौकशीमध्ये मोठा खुलासा केला आहे. तिचं म्हणण्याप्रमाणे सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती.

सुशांतच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. मात्र पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (sushant singh rajput) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. मात्र पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. गेले 6 महिने तो नैराश्येत होता. दरम्यान आज सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, त्याचे वडील आणि कुटुंबिय काही वेळात मुंबईत दाखल होतील. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचं समोर आलं आहे. याचाच अर्थ सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. सुशांतच्या आत्महत्येच्यावेळी घरात उपस्थित असलेल्या 2 कूक, 1 नोकर आणि एक आर्ट डिझायनर यांचा जबाब घेतला आहे. वाचा- Sushant Singh Suicide: ‘महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही,केंद्राने तपास करावा’ दरम्यान, आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री सुशांतने दोन जणांना फोन केला होता. यात त्याची गर्लफ्रेंण्ड मानली जाणारी रिया चक्रवर्ती आणि पवित्रा रिश्तामधील अभिनेता महेश शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र या दोघांनीही फोन उचलला नाही, या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. वाचा- अंकितानं सुशांतच्या लगावली होती कानशिलात, नाईट क्लबमध्ये ‘त्या’ काय घडलं पोलिसांनी सुशांतच्या घरून सुसाइड नोट सापडली नसली तरी काही मेडिकल कागदपत्र सापडले आहेत. ज्या डॉक्टरांकडे त्याचे उपचार सुरू होते, त्यांचीही चौकशी केली जाईल. याशिवाय सुशांतची एक्स गर्लफ्रेंण्ड अंकिता लोखंडेचा जबाबही नोंदवला जाऊ शकतो. सुशांतच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे, यात गेल्या 24 तासांत ज्यांच्याशी त्याचा संपर्क झाला, त्या सर्वांची चौकशी पोलीस करणार आहेत. काही दिवसांआधी सुशांतसोबत रिया राहत होती मुंबई पोलिसांनी अद्याप सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवला नाही आहे. मात्र लवकरच रियाची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर या दोघांमधील नातेसंबंधाबाबतही चौकशी होईल. काही दिवसांआधी सुशांतसोबत रिया राहत होती. मात्र त्यानंतर ती आपल्या घरी शिफ्ट झाली, या मागे काय कारण होते, याबाबतही चौकशी केली जाईल. वाचा- कोण आहे रिया चक्रवर्ती? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर होतेय तिची चर्चा वाचा- सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, सुसाइडआधी केला होता मित्राला कॉल पण… संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात