Home /News /entertainment /

कोण आहे रिया चक्रवर्ती? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर होतेय तिची चर्चा

कोण आहे रिया चक्रवर्ती? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर होतेय तिची चर्चा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

  मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajpaut)आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुशांत मागच्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यानं मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नसून याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पण सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सुशांत सिंह राजपूतचं अंकिता लोखंडेसोबतच रिलेशनशिप आणि त्यानंतर त्यांचं झालेलं ब्रेकअप याबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. पण अंकिता नंतर सुशांतचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. केदारनाथच्या शूटिंगच्या वेळी सुशांत आणि सारामध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचं बोललं जात होतं मात्र त्या अफवा असल्याचं नंतर समोर आलं. त्यानंतर सुशांतचं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी. मागच्या काही दिवसांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे आता रियाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र सुशांतच्या निधनावर रियाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
  सुशांतसोबत नात्यावर काय म्हणाली होती रिया... रिया आणि सुशांतच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर अनेकदा झाल्या आहेत. मात्र या दोघांनी याबद्दल कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखातीत रियानं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली होती. सुशांत आपला बॉयफ्रेंड नाही तर एक चांगला मित्र आहे असं रियानं एका मुलाखतीत म्हटलं होतं. रिया म्हणाली, आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आणि आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं. त्यामुळे आमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे. इ-टाइम्सशी बोलताना रिया म्हणाली, मी किंवा सुशांत दोघांपैकी कोणीच हे अफेअर कधीच एक्सेप्ट केलं नव्हतं. कारण आमच्या तसं काहीही नाही. सुशांत माझा खूप चांगला मित्र आहे. मागच्या 8 वर्षांपासून आम्ही दोघंही एकमेकांना ओळखतो. सुशांत खूप हॅन्डसम आणि सुंदर आहे. मात्र त्याला माझ्याबद्दल काय वाटतं हे मला माहित नाही.
  एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांतनं त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. होती. मात्र त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं ते 'कई पो छे' या सिनेमातून. 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमानं लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. अगदी अलिकडच्याच काळात रिलीज झालेला त्याचा 'छिछोरे' हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या