Home /News /entertainment /

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, सुसाइडआधी केला होता मित्राला शेवटचा कॉल पण...

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, सुसाइडआधी केला होता मित्राला शेवटचा कॉल पण...

नैराश्यामध्ये असणाऱ्या सुशांतने शेवटी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाण्याने संपू्र्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नैराश्यामध्ये असणाऱ्या सुशांतने शेवटी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाण्याने संपू्र्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत 6 महिने नैराश्येत होता. सध्या सुशांतचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

    मुंबई, 14 जून : सुशांत सिंह राजपूतनं (sushant singh rajput suicide) आत्महत्या करत बॉलिवूडपासून सर्व देशवासियांना धक्का दिला. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नाही आहे. मात्र पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. सध्या सुशांतचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ताजी अपडेट समोर आली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार सुशांतनं हिरव्या कपड्यानं आपल्या बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. पोलिसांना सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही आहे. दरम्यान, मध्यरात्री सुशांतनं एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला. पण त्यानं फोन उचलला नाही, त्यामुळे दोघांचं बोलणं झालं नाही. रविवारी सकाळी दहा वाजता सुशांतने ज्यूस मागवला, आणि तो आपल्या खोलीत गेला. यानंतर सुशांतन बाहेर आलाच नाही. घरकाम करणाऱ्या नोकरांनी आणि मित्रानं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार लॉक होतं, अखेर नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलवलं. त्यानंतर दरवाजा उघडला. दार उघडल्यानंतर सुशांतचा मृतदेह पाहून नोकरांनी पोलिसांना फोन केला. दुपारी 12.45 वाजता सुशांतच्या बेडरूमचा दरवाजा तोडण्यात आला. सुशांतसोबत वांद्रे येथील घरात 4 लोकं राहत होती. यात दोन कुक, एक नोकर आणि एक आर्ट डिझायनर होता, जो त्याचा मित्रही आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत 6 महिने नैराश्यात होता. वाचा-DEPRESSION मध्ये होता सुशांत सिंह राजपूत; 'ही' आहेत लक्षणं आईबाबत अखेरची भावनिक पोस्ट सुशांत अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करत असायचा, मात्र त्याची अखेरची पोस्ट ही खास होती. त्यानं आपल्या आईच्या आठवणीत लिहिलेली एक कविता शेअर केली होती. सुशांतनं यात त्याच्या आईसोबतचा फोटो कोलाज करून, "अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई", अशी भावनिक कविता शेअर केली होती. वाचा-sushant singh death: या कारणांमुळे होता सुशांत सिंह राजपूत होता डिप्रेशनमध्ये? बिहार ते बॉलिवूड...कसा होता सुशांतचा प्रवास? सुशांत सिंह हा मूळचा बिहारचा असून काही दिवसांपूर्वी तो आपल्या वडिलोपार्जित घरीही आला होता. तो मूळचा पूर्णियामधील बधारा कोठी येथील मालडीहाचा रहिवासी होता आणि शेवटच्या वेळी जेव्हा त्याने आपल्या गावाला भेट दिली तेव्हा त्याने कौटुंबिक कार्यक्रमातही भाग घेतला होता. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल अजूनही बिहारच्या लोकांना विश्वास वाटत नाही. खरं तर, शेवटच्या वेळी जेव्हा तो बिहारला आला तेव्हा ते त्याच्या वडिलांच्या गावातील नागरिकांशी खूप मिसळला होता. बिहारच्या या उगवत्या स्टारने 'पवित्र रिश्ता' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. एमएस धोनीसह काय पो चे, शुद्ध देसी रोमान्स, पीके, केदारनाथ आणि त्याचे इतर अनेक चित्रपट हिट झाले आहेत. वाचा-आत्महत्येप्रकरणी अखेर सुशांतच्या टीमने जारी केलं अधिकृत स्टेटमेंट संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या