मुंबई, 21 जानेवारी: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलायचं म्हटलं कि शब्द अपुरे पडतात. सुशांत हा असा स्टार होता, ज्याच्या जाण्यावर वर्षांनंतरही विश्वास बसणे कठीण आहे. सुशांतला जाऊन दोन वर्ष झाली तरी त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणीत रडतात. आज म्हणजेच 21 जानेवारी सुशांतचा वाढदिवस आहे. सुशांतच्या जाण्यानंतर त्याला न्याय मिळण्यासाठी त्याच्या बहिणी खूप लढल्या. त्याच्या बहिणी त्याच्यावर खूप प्रेम करतात. सुशांतची बहीण प्रियंका सिंगने सुशांतसाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्टही लिहिली आहे. तिने सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
श्वेताने सुशांतचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं आहे कि, ''माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जिथे कुठे असतील तिथे खुश राहा. मला तर वाटतं की तू भगवान शंकराबरोबर आता कैलासात फेरफटका मारत असशील. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कधीतरी तू आहेस तिथून खालीही बघ. तुला दिसेल की तू काय जादू केली आहेस आणि तुझ्यासारख्या सोनेरी मनाच्या अनेक सुशांतना जन्म दिला आहेस. मला तुझा अभिमान वाटतो आणि तो कायमच वाटत राहील.''
तसेच श्वेताने तिचा एक व्हिडीओ शेअर करत सुशांतच्या काही बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तिने व्हिडीओच्या मार्फत त्यांच्या घरी असलेले सुशांतचे कधीही न पाहिलेले काही जुने फोटो चाहत्यांना दाखवले. तसेच तिने ट्विटरवर तिच्या लग्नातील एक फोटो शेअर करत भावुक करणारा मेसेज देखील लिहिला आहे. सुशांतच्या बहिणीने त्याच्या आठवणीत शेअर केलेल्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
तिने केलेल्या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने लिहीलंय कि, 'सदैव खुश रहा. सुशांत नेहमी तुमच्या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या आसपास असेल.' असं म्हणत चाहते तिला धीर देत आहेत.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे येथील घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करत आहे. त्याचा मृत्यू आत्महत्या असल्याचे ठरवले जात असताना, गेल्या महिन्यात अभिनेत्याच्या हत्येचे ताजे दावे समोर आले. तथापि, मृत्यू प्रकरणात अद्याप एजन्सीने कोणताही क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला नाही. सीबीआय तपासाव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील या प्रकरणातील आर्थिक आणि ड्रग्जशी संबंधित कोनांचा शोध घेत आहेत. त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Sushant sing rajput, Sushant singh sisters