मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sushant Singh Rajput B'day: भुकेने व्याकूळ, डोळ्यात भीती अशी झालेली सुशांतची अवस्था; अभिनेत्याचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते सुन्न

Sushant Singh Rajput B'day: भुकेने व्याकूळ, डोळ्यात भीती अशी झालेली सुशांतची अवस्था; अभिनेत्याचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते सुन्न

सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह राजपूत

बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळविणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत होय. कुटुंबाची कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना सुशांतने स्वतः च्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूने देशाला धक्का बसला होता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,21 जानेवारी- बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळविणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत होय. कुटुंबाची कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना सुशांतने स्वतः च्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूने देशाला धक्का बसला होता. अभिनेत्याच्या निधनाला 3 वर्षे होत आली अद्यापही त्याच्या मृत्यूबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. चाहते सतत सुशांतच्या आठवणीत रमलेले असतात. आजचा दिवस चाहत्यांसाठी खास आहे. कारण आज सुशांत असता तर तो आपला 37 वा वाढदिवस साजरा करत असता. आज अभिनेत्याच्या बर्थ अनिव्हर्सरीच्या निमित्ताने अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 3 वर्षे झाली आहेत. मात्र आजही चाहते अभिनेत्याला तितकंच मिस करतात.सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याचे अनेक फॅनपेज तयार केले आहेत. या पेजच्या माध्यमातून सुशांतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जातात. आजही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.मात्र हा व्हिडीओ पाहून चाहते सुन्न झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर नाराजी व्यक्त करत आहेत.

(हे वाचा:Sushant Singh Rajput: सुशांत राजपूतच्या फ्लॅटमध्ये येणार नवीन भाडेकरू;अभिनेत्याच्या मृत्यूनंतर रिकामं होतं घर )

सुशांत सिंह राजपूतच्या एका फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत दिसून येत आहे. परंतु यामध्ये त्याची अवस्था फारच वाईट दिसून येत आहे. यामध्ये अभिनेता फारच कमकुवत आणि आजारी दिसून येत आहे. सोबतच व्हिडीओमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती बोलताना आणि व्हिडीओ बनवताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सुशांत सिंहच्या शेवटच्या दिवसाचा असल्याचं म्हटलं जात आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहते भावुक होत आहेत. सोबतच रिया चक्रवर्तीवर चाहते भडकलेले दिसून येत आहेत. अनेकांनी कमेंट करत रियाने त्याला जेवणच दिलं नसल्याचं म्हटलं आहे. अशा अवस्थेत कोणी हसत हसत व्हिडीओ कसा बनवू शकतो? असं म्हणत चाहते रियावर नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच आजच्या दिवशी चाहते सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जून 2020मध्ये झाला होता. अभिनेत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकाराने देशाला धक्का बसला होता. अभिनेत्याच्या कुटुंबासोबत चाहते सुन्न झाले होते. या प्रकरणात अभिनेत्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. सोबतच एक मोठं ड्रग्स कनेक्शन समोर आलं होतं. तिच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Sushant sing rajput