मुंबई, 04जानेवारी : महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सध्या रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड सिनेमाचं वेड लागलेलं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही ‘वेड’ सिनेमाचीच हवा आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या नव्या सिनेमाला महाराष्ट्रातून तूफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचा दमदार ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांनी सिनेमाविषयी उत्सुकता दाखवली होती. त्यानंतर आलेल्या सिनेमातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. संगितकार अजय अतुल यांचं संगीत वेड सिनेमाला देण्यात आलं आहे. दोघांनी सिनेमाच्या कथेनुसार बांधलेली गाणी सिनेमाला आणखी वर घेऊन जात आहेत. रितेश आणि जिया शंकर यांच्यावर चित्रीत झालेलं ‘वेड तुझे’ हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तसंच जिनिलियाचं ‘बेसुरी’ गाण्यालाही वेगळा बाज असलेल्या पाहायला मिळालं. त्याचनंतर सिनेमातील एक गाणं प्रेक्षकांना भयंकर आवडलंय ते म्हणजे ‘मला वेड लावलंय वेड लावलंय’. रितेश आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. सलमान आणि रितेशची गाण्यातील हुक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर अनेक जण सलमान आणि रितेशची ही हुक स्टेप करून धुमाकूळ घालताना दिसत आहेत. हेही वाचा - टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा ‘तुझे मेरी कसम’? 20 वर्षांनी कारण आलं समोर
फक्त नेटकरीच नाही मराठी कलाकारही मला वेड लागलंय म्हणताना दिसत आहेत. ही हुक स्टेप सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी देखील हा ट्रेंड फॉलो केला आहे. साधा सुधा नाही तर अस्सल मराठमोळ्या नऊवारी साडीत सुरेखा कुडची मला वेड लागलंयची हुक स्टेप केली आहे. सुरेखा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय. अभिनेत्री सुरेखा कुडची या सध्या कलर्स मराठीवरील ‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली असून काकी साहेबांची भूमिका त्या साकारत आहेत. मालिकेचं शुटींग साताऱ्यात सुरू आहे. साताऱ्याच्या हिरव्यागार शेतात सुरेखा कुडची यांनी व्हिडीओ शुट केला आहे. मालिकेच्या शुटींगमधून वेळ काढून त्यांनी फावल्या वेळेत व्हिडीओ केलाय. व्हिडीओमध्ये त्या काकी साहेबांच्या वेशात नऊवारी साडीत आहेत.
सुरेखा कुडची वेडवर दणकून नाचल्या आहेत.त्यांच्या डान्सवर चाहते फिदा झालेत.