मुंबई, 03 जानेवारी: बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूड नाही तर मराठी सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळतोय. तो सिनेमा म्हणजे ‘वेड’ . रितेश देशमुखच्या वेड या सिनेमानं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक केला. पण आठवड्यात सिनेमानं केलेल्या कमाईनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेमानं बॉलिवूडला देखील टक्कर दिल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दरदिवशी बक्कळ कमाई करतोय. आतापर्यंत सिनेमानं किती करोडची कमाई केली पाहूयात. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा वेड हा सिनेमा 30 डिसेंबर 2022ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सरत्या वर्षात वेडनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तर नव्या वर्षातही सिनेमानं दमदार कमाई केली आहे. वेड सिनेमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आधीपासूनच पाहायला मिळत होती. सिनेमा प्रदर्शनाआधी 0.65 करोड अडवान्स बुकींग झालं होतं. यावरून सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल हे दिसून आलं होतं. हेही वाचा - Ved Day 1 Box Office Collection : पहिल्याच दिवशी लावलं प्रेक्षकांना वेड; जमवला इतक्या करोडचा गल्ला
#Marathi film #Ved is UNSTOPPABLE… Passes the make-or-break Monday test with flying colours… Day 4 [Mon] is HIGHER than Day 1 [Fri], which is a rarity… EXCELLENT TRENDING… Fri 2.25 cr, Sat 3.25 cr, Sun 4.50 cr, Mon 3.02 cr. Total: ₹ 13.02 cr. pic.twitter.com/cGCdrBQzTs
— taran adarsh (@taran_adarsh) January 3, 2023
सिनेमा क्रिटिक तरण आदर्शनं केलेल्या ट्विटनुसार, वेड सिनेमानं पहिल्या दिवशी म्हणजेच ओपनिंग डेला 2.5 करोडची कमाई केली होती. मराठी सिनेमांमध्ये वेडनं सिनेमानं ओपनिंग डे कमाईमध्ये पाचवा क्रमांक मिळवला. वेडनं दुसऱ्या दिवशी म्हणजे 31च्या दिवशी शनिवारी 3.25 करोडची कमाई केली. नव्या वर्षात रविवारी 1 जानेवारी 2023ला सिनेमानं सर्वाधिक 4.50 करोडची कमाई केली. तर सोमवारी 2 जानेवारीला 3.02 करोडची कमाई केली. सिनेमानं पहिल्या आठवड्यात एकूण 13.02 करोडचा गल्ला जमावला आहे.
दिग्दर्शक म्हणून अभिनेता रितेश देशमुखचा वेड हा पहिला सिनेमा आहे. तर अभिनेत्री जिनिलिया देशमुखनं सिनेमाची निर्मिती केली आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्यासह सिनेमात अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमानं पहिल्या आठवड्यात केलेल्या घसघशीत कमाईनं येणाऱ्या दिवसातही सिनेमा याहून तगडी कमाई करेल यात शंका नाही. वेड सिनेमाला सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत.