रितेश आणि जिनिलिया 'हे तुझे मेरी कसम' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र आले होते. याच सिनेमात दोघांची कमेस्ट्री जमली.
तुझे मेरी कसम या सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 जानेवारी 2003मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं रितेश आणि जिनिलिया यांच्यात आयुष्यात मोठी घडामोड घडवली.
तुझे मेरी कसमच्या सेटवर रितेश जिनिलिया यांची ओळख झाली आणि पुढे ते डेट करू लागले. आज वेड सिनेमातील रितेश आणि जिनिलिया यांची जोडी अनेक वर्षांनी पाहायला मिळाली.
रितेश आणि जिनिलिया ज्या सिनेमातून एकत्र आले तो तुझे मेरी कसम हा आपल्यातील फार कमी लोकांनी पाहिला असले.
सिनेमा मागच्या 20 वर्षात कधीच टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला किंवा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला मिळत नाही. असं का? याचं कारण समोर आलं आहे.
रितेश आणि जिनिलियाच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती रामोजी राव यांनी केली होती. लोकांनी पुन्हा पुन्हा येऊन थिएटरमध्ये सिनेमा पाहावा असं त्यांचं मत होतं.
रामोजी राव यांनी सिनेमाचे डिजिटल राइट्स त्यावेळेस विकले नाहीत. मुव्ही चॅनेल फक्त तेच सिनेमे दाखवू शकते जे ज्यांचे अधिकार त्यांना आहेत. प्रोडक्शन हाऊनकडून खरेदी केलेले सिनेमे ते दाखवतात.
तुझे मेरी कसम हा सिनेमा 2003मध्ये प्रदर्शित झाला होता मात्र त्याचे डिजिटल राइट्ल नसल्यामुळे हा सिनेमा आजवर चॅनेलवर दाखवण्यात आला नाही.
त्यामुळे रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा पहिला एकत्रित सिनेमा तुझे मेरी कसम प्रेक्षकांना ओटीटी किंवा मुव्ही चॅनेलवर पाहता येत नाही.