• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • SSR Case: 'चहामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला...', रियाचे 6 WhatsApp चॅट समोर आल्याने खळबळ

SSR Case: 'चहामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला...', रियाचे 6 WhatsApp चॅट समोर आल्याने खळबळ

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना रोज नवे अँगल समोर येत आहेत. मनी लाँड्रिंगच्या अँगल व्यतिरिक्त आता या प्रकरणी ड्रग डीलिंगचा संशय आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो देखील यात चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑगस्ट : सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना सीबीआयसमोर रोज नवे अँगल समोर येत आहेत. मनी लाँड्रिंगच्या अँगल व्यतिरिक्त आता या प्रकरणी ड्रग डीलिंगचे संशय आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो देखील यात चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. काही मीडिया अहवालानुसार रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) WhatsApp चॅट समोर आल्याने अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण देखील समोर येत आहे. तिने काही लोकांशी बातचीत केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान रियाच्या वकिलाने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे. तिच्या वकिलांचे असे म्हणणे आहे की रियाने कधी ड्रग्ज घेतले नाही आहेत. (हे वाचा-SSR Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या हस्तक्षेपामुळे रियाच्या अडचणी वाढणार?) याप्रकरणी समोर आलेले रियाचे चॅट्स धक्कादायक आहेत- पहिले चॅट हे चॅट रिया आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव तोच इसम आहे, जो ड्रग डीलर असल्याचे म्हटले जात आहे. या चॅटमध्ये असे म्हटले आहे की, 'जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे'. हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवला होता. दुसरे चॅट दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवशी बातचीत केली आहे. यामध्ये रियाने गौरवला विचारले आहे की, ' तुझ्याकडे MD आहे का?'. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे. (हे वाचा-"तिने आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत", रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळला दावा) तिसरे चॅट हे चॅट रिया आणि जया साहा यांच्यामधील आहे. हे चॅट 25 नोव्हेंबर 2019 चे आहे. ज्यामध्ये जयाने रियाला असे म्हटले आहे की-मी त्याला श्रुतीशी  कोऑर्डिनेट करायला सांगितले आहे. त्यावर रियाने धन्यवादचा मेसेज केला आहे. त्यानंतर जयाने असा रिप्लाय दिला आहे की- नो प्रॉब्लेब, आशा आहे की याची मदत होईल. चौथे चॅट या चॅटमध्ये जया रियाला असे म्हणते की, 'चहा, कॉफी किंवा पाण्यामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला ते पिऊ दे. परिणाम पाहण्यासाठी 30 ते 40 मिनीट थांब'. दोघांमध्ये हे संभाषण 25 नोव्हेंबर 2019 रोजी झाले होते. पाचवे चॅट एप्रिल 2020 मधील मिरांडा आणि रियामधील चॅट समोर आले आहे. त्यामध्ये मिरांडाने असे म्हटले आहे की - 'हाय रिया, स्टाफ जवळपास संपला आहे.' सहावे चॅट एप्रिलमध्ये पुन्हा एकदा मिरांडाने रियाला असे विचारले आहे की, 'काय आपण हे शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो? पण त्याच्याकडे फक्त Hash आणि bud आहे'. यांना लोअर लेव्हलचे ड्रग मानले जाते. (हे वाचा-सुशांतच्या प्रकरणावरुन कपिल शर्मा शो होतोय ट्रोल, बॉयकॉट करण्याची केली मागणी) दरम्यान ईडीला रियाच्या फोनमध्ये एका संशयास्पद ड्रग डीलरचा नंबर मिळाला होता. रियाचा फोन ईडीने रिट्राइव्ह केला, तेव्हा त्यांना एका ड्रग डीलरशी केलेले चॅट मिळाल्याचे मीडिया अहवालात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर रियाने या अंमली पदार्थ तस्कराशी चॅट करून ते डीलिट केल्याचा दावा देखील केला जात आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: