या दिवसात लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पसंत आणि नापसंत जाहीर करीत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियासह सर्वसामान्य लोकांमध्येही सिनेमा जगाबाबत नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आहे. ज्या सलमान खानच्या चित्रपटाला कधी 100 कोटी रुपये कमविण्याची गॅरेटी होत असे, आता त्याच सलमानविरोधात जोरदार विरोध केला जात आहे. सुशांत प्रकरणानंतर सलमानच्या चित्रपटानंतर तो प्रोड्यूस करीत असलेल्या मालिकांनाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.
टिव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो प्रोड्यूसर सलमान खान आहेत. आता सलमान खानमुळे लोक हा शो बॉयकॉट करण्याची मागणी करीत आहेत.
कपिल शर्माचा शो बॉयकॉट करण्यासंबंधितची पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. लोकांनी एकत्रितपणे हा शो न पाहण्याबाबत वक्तव्य करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी बिग बॉसबाबत अशा स्वरुपाचं अभियान चालवलं जात होतं. जेव्हा सलमानने याचा पहिला प्रोमो प्रमोट केला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर सलमान खानबाबत एक माहिती समोर आली होती. सलमान सुशांतला घेऊन चित्रपटाची निर्मिती करणार होते. मात्र मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी चित्रपटाची निर्मिती बंद केली, तर सुरज पंचोलीच्या प्रकरणातही त्यांनी सुशांतला समजावले होते, अशी चर्चा आहे.
मात्र ही बाब किती खरी आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र याच गोष्टींवरुन सोशल मीडियावर खूप टीका केली जात आहे.