• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • "तिने आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत", रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळला दावा

"तिने आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत", रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळला दावा

मात्र चित्रपटांमध्ये रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा'तून पदार्पण केले. मात्र चित्रपट प्लॉप झाला.

मात्र चित्रपटांमध्ये रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा'तून पदार्पण केले. मात्र चित्रपट प्लॉप झाला.

सुशांत सिंग राजपूत (Sushant singh rajput) प्रकरणाचा आता ड्रग्जच्या अँगलनेही तपास केला जाणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी सीबीआय (CBI), ईडीनंतर (ED) आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोही (NCB) तपास करणार आहे. या प्रकरणात आता वेगळा अँगलही तपासला जाणार आहे. ड्रग्जच्या (drugs) अँगलवरून या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. यावरून रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तिची बाजू मांडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (Narcotics Control Bureau) पत्र लिहिलं आहे. सुशांतशी संबंधित काही लोक ड्रग्ज घेत होते. काही जण ड्रग्ज डिलरशीही संपर्कात होते, अशी माहिती ईडीने एनसीबीला दिली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्तवाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितलं की, "आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करत आहोत. आमची एनसीबीची ऑपरेशन टीम आणि बाकी दुसरी टीम या प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार आहे. हा तपास मोठ्या स्तरावर करण्यात येणार असून दिल्ली-मुंबईतील मोठे आणि अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाईल" दरम्यान या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी बाजू मांडली आहे. "रियाने तिच्या आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत. तिची कधीही रक्तचाचणी करू शकता. रिया ब्लड टेस्टसाठी कधीही तयार असेल", असं रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं. हे वाचा - सुशांतचा मृ्त्यू आर्थिक वादातून झाल्याचा संशय; ED पाठोपाठ CBI देखील करणार तपास अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी आता अनेक दावे करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी भारताची गुप्तचर संस्था RAW चे माजी अधिकारी एन.के. सूद यांनी दावा केला आहे की, सुशांतची हत्या अंडरवर्ल्डने केली असावी. 'टाईम्स नाऊ'वर बोलतांना त्यांनी हा दावा केला आहे. सूद म्हणाले, ही हत्या अंडरवर्ल्डने केली असावी. त्यांनी अतिशय सुनियोजित पद्धतीने हे काम केलं असावं. त्यांनी यासाठी सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नोकरांचाही वापर केला असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सुशांतच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे वळविण्यात आले होते. पोलिसांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हे काम केलं गेलं असावं असंही ते म्हणाले. हे वाचा - संजय दत्तला मिळाला यूएस व्हिजा; कॅन्सरवरील उपचारासाठी लवकरच अमेरिकेला जाणार मुंबईतील वांद्र्यातील राहत्या घरात 14 जूनला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुशांतचा मृत्यू आढळला होता. याप्रकरणी आता वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू आहे.
  Published by:Priya Lad
  First published: