• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • SSR Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या हस्तक्षेपामुळे रियाच्या अडचणी वाढणार? असा होणार तपास

SSR Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या हस्तक्षेपामुळे रियाच्या अडचणी वाढणार? असा होणार तपास

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushan Singh Rajput Death) सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान याप्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushan Singh Rajput Death) सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान याप्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करतआहेत. ते ड्रग अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत. काही मीडिया अहवालानुसार रियाचे WhatsApp चॅट समोर आल्याने अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण देखील समोर येत आहे. तिने काही लोकांशी बातचीत केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान रियाच्या वकिलाने या सर्व आरोपांते खंडन केले आहे. कसा करणार एनसीबी अंमली पदार्थांसंबधीत तपास? -दिल्ली एनसीबीचे मुख्यालय आर के पुरम येथे काल संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आजसुद्धा रात्री 11 वाजता दिल्ली मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. (हे वाचा-सुशांतच्या प्रकरणावरुन कपिल शर्मा शो होतोय ट्रोल, बॉयकॉट करण्याची केली मागणी) -रियाचे ज्या ड्रग डीलर्सशी संबंध समोर आले आहेत, त्यांचा शोध NCB कडून घेतला जाणार आहे. - एनसीबी रियाच्या त्याचप्रमाणे सुशांतच्या मित्रांबद्दल देखील माहिती गोळा करणार आहे.  रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या मित्रांबाबत देखील माहिती गोळा केली जाणार आहे. - एनसीबी रिया, सुशांत आणि शोविक यांच्यात झालेल्या फोन कॉलचा अभ्यास करणार - एनसीबी मुंबई पुणे येथे नव्याने पकडून तुरुंगात टाकलेल्या अंमली पदार्थ तस्कारांची चौकशी करु शकते. कारण सुशांत मृत्यू प्रकरणात काही धागेदोरे सापडू शकतात. (हे वाचा-"तिने आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत", रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळला दावा) - एनसीबी 2020, 2019 आणि 2018 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या रेव पार्टीचा शोध घेवून त्या रेव पार्ट्यांची सखोल चौकशी करणार आहे. जेणेकरुन त्यात अटक केलेल्या लोकांची चौकशी करुन त्यातून काही माहिती मिळू शकेल. - एनसीबीच्या निशाण्यावर मुंबईतील सर्व ड्रग सिंडिकेट असतील. ज्यामध्ये छोट्या मोठ्या सर्व अंमली पदार्थ तस्करांची चौकशी करण्यात येणार आहे. - एनसीबी आपल्या इंटेलिजेंस नेटवर्कद्वारे  रियाचे सर्व दौरे, पार्ट्या, ती कोणत्या कोणत्या रेस्टॉरंटमध्ये-हॉटेल्समध्ये गेली, कोणत्या कॉफी शॉपमध्ये गेली, भारतात आणि परदेशात कुठे कुठे गेली याची चौकशी करणार आहे. मीडिया अहवालानुसार सुशांतच्या मृत्यूचे दुबई कनेक्शन देखील एनसीबीकडून तपासण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुबईतील ज्या ड्रग डील अयाश खानचे नाव समोर येत आहे, त्याची सर्व माहिती  शोधण्यात येणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: