मुंबई, 13 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. 13 ऑगस्ट 1963, मध्ये तमिळनाडूतील सिवाकासी येथे झाला होता. चांदनी बॉलिवूडच्या आसमंतातून निखळली आणि आपल्या लाडक्या श्रीदेवीबद्दल अनेक आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या. तुम्हाला एक गंमत माहितीय. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीने आईशी बोलणं टाकलं होतं.कारण ऐकाल ते हसाल. कमल हासनसोबतचा सदमा चित्रपट सहा वर्षांच्या जान्हवीने पाहिला आणि मग काय तू एक वाईट आई आहे. तू कमल हासनसोबत चांगलं नाही केलंस, असं म्हणत या छोट्या जान्हवीने आईशी तीन दिवस बोलणं टाकलं होतं. हिमांश कोहलीनंतर आता या स्पर्धकाला डेट करतेय नेहा कक्कर?
श्रीदेवीच्या जाण्याने कपूर कुटुंबीयासोबतच जान्हवी आणि खुशीला मोठा धक्का बसला होता. आजही बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. . जान्हवीसाठी श्रीदेवीचं जाणं कायमच चटका लावून गेलं. कारण जान्हवी करण जोहर दिग्दर्शित ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. म्हणून आपल्या ट्विटर अकाऊंटवर जान्हवीच्या पहिल्या चित्रपटासंबंधीचे प्रमोशनलं ट्विट पिनअप करून ठेवलं होतं. मात्र चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच या ‘मॉम’ने जगाचा निरोप घेतला.
Dream Girl Trailer: हेमा मालिनीला नाही तर आयुष्मानला म्हणाल ‘ड्रीम गर्ल’
ना जाने कहाँसे आयी है लडकी, या गाण्याचं शूट करताना श्रीदेवीच्या अंगात तब्बल 103 ताप भरला होता. तरीही तिने शूटिंग पूर्ण केलं, यावरूनच श्रीदेवीसाठी अभिनय आणि तिचं काम हेच पहिलं प्रेम होतं हे दिसतं तुम्हाला तो मिस्टर इंडियातील 8 मिनिटांचा चार्ली चॅप्लिन’चा सीन आठवतो? या प्रसंगाबद्दल असा एक किस्सा सांगितला जातो की जिम कॅरी या हॉलिवूड मधल्या कलाकारालाही श्रीदेवीचा हा अभिनय आवडला होता. आपण असे भाव चेहऱ्यावर कधीही आणू शकत नाही अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली होती.
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश- जेनेलिया देशमुख, केली 25 लाखांची मदत
सिनेसृष्टीच्या प्रवासात अनिल कपूर आणि श्रीदेवी गाजलेली जोडी होती. चाहते आणि दिग्दर्शक त्या काळात या जोडीला खूप पसंती देत होते. पण अचानक श्रीदेवीने अनिल कपूरसोबत चित्रपट करण्यास नकार दिला. कारण असं होतं की बोनी कपूरशी लग्न झाल्यावर अनिल कपूर श्रीदेवीचा दीर झाला आणि दीरासोबत ऑनस्क्रिन शेअर न करण्याचा निर्णय श्रीदेवी भाभीने घेतला.
तब्बल 90 किलोच्या सारा अली खानने असं कमी केलं वजन!
लग्नाची गोष्ट निघाली आहे तर असं म्हणतात की श्रीदेवी अभिनयाच्या शिखरावर असताना राकेश रोशन यांच्या ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटावेळी अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात पडली होती. काही काळ त्याच्याबरोबर संसार केला होता असंही काही जण म्हणतात. पण पुढे त्यांच्यात बेबनाव झाल्याने मिथुनला सोडचिट्टी देऊन तिने बोनी कपूर बरोबर नवा संसार थाटला तो अखेरपर्यंत..! खळखळून हसवणारी श्रीदेवी 26 फेब्रुवारी 2018 सगळ्यांना रडवून गेली हे मात्र नक्की. मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीत गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले…. ==================================================================== SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?

)







