बॉलिवूड अभिनेत्री साला अली खान आज तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने करिना कपूरशी लग्न केलं.
कोलंबिया युनिवर्सिटीमधून साराने शिक्षण घेतलं असून केदारनाथ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता
सारा अली खान फिट असून ती नियमित वर्कआउट करताना दिसते. पण सुरुवातीचा काळ असा नव्हता. एक वेळ अशी होती की साराचं वजन 90 किलोंपेक्षाही जास्त होतं. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने स्वतःवर फार मेहनत घेतली.
साराने बाजार इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, तिला polycystic ovary syndrome (PCOD) चा त्रास आहे. सारा म्हणाली की, 'आपण एकीकडे समानता आणि प्रत्येकाला स्वीकारण्याची गोष्ट करतो. पण, आपण असे सिनेमे पाहू शकतो का ज्याची अभिनेत्री ही 96 किलोंची असेल.'
फार कमी लोकांना हे माहीत आहे की, सारा अली खानने दीड वर्षात 20 किलो वजन कमी केलं. यानंतर तिने डाएट आणि वर्कआउट नियमित सुरू ठेवलं. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटलं की, 'स्वतःला शेपमध्ये ठेवण्यासाठी कथक, योग, पिलाटे आणि इंटेन्स वर्कआऊट करणं सुरू केलं.
वर्कआउटसोबत तिने आपल डाएट प्लॅनही बदलला. तिने पिझ्झा आणि चॉकलेटला कायमचं बाय म्हटलं आणि सलाडला आपलसं केलं. याशिवाय तिने प्रोटीनवरही विशेष लक्ष दिलं.'
सारा लवकरच कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका असेल. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.
या वर्षी सारा तिचा वाढदिवस सिनेमाच्या सेटवरच साजरा करणार आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण थायलंडमध्ये करण्यात येत असून वाढदिवसाला सुट्टी घेऊन तिने घरी येण्यासही नकार दिला.
डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी साराच्या वाढदिवसानंतर सिनेमाचं चित्रीकरण सुरू करण्याचा पर्याय तिला दिला होता. मात्र साराने वाढदिवसालाही काम करण्याचा पर्याय निवडला.
साराचा कथित प्रियकर कार्तिक आर्यन तिला वाढदिवसाला खास भेट देणार आहे. सध्या कार्तिक त्याच्या आगामी पती पत्नी और वो सिनेमाचं चित्रीकरण लखनऊमध्ये करत आहे. साराच्या वाढदिवसासाठी कार्तिक खास थायलंडला रवाना झाल्याचं कळत आहे.