हिमांश कोहलीशी झालेल्या ब्रेकअपमुळे बॉलिवूड गायिका नेहा कक्कर तुफान चर्चेत आली होती. ब्रेकअपनंतर ती काही महिने डिप्रेशनमध्ये गेल्याचंही तिने मान्य केलं होतं. मात्र आता तिच्या आयुष्यात आनंद पुन्हा परत आलाय.
सध्या नेहाचं नाव इंडियन आयडॉलचा स्पर्धक विभोर पराशरशी जोडलं जात आहं. मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि विभोर यांच्यातली जवळीक वाढत आहे.
विभोर हा इंडियन आयडॉल 10 चा स्पर्धक होता. या सीझनची जज नेहा कक्कर होती. शो संपल्यानंतरही नेहा आणि विभोरने एकत्र काम केलं.
इंडियन आयडॉलनंतर नेहाने विभोर आणि कुशाल पंडितसोबत अनेक म्युझिक टूर आणि परफॉर्मन्स केले. याच म्युझिकल टूरमध्ये नेहा आणि विभोर यांच्यात जवळीक निर्माण झाली.
बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत विभोर म्हणाला की, ''जवळीक' या गोष्टीवर आताजणू शिक्कामोर्तब झालं आहे. मी जर विभोर पराशर आहे तर ते तिच्यामुळेच आहे. मी तिचा आदर करतो. त्यामुळे मी या अफवांवर बोलूही इच्छित नाही. अशा गोष्टी ऐकून माझं डोकं फिरतं.'
रिलेशनशिपच्या चर्चांवर नेहा कक्कडने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी सोशल मीडियावर तिचे आणि विभोरचे अनेक फोटो सतत व्हायरल होत असतात. स्वतः विभोर इन्स्टाग्रामवर तिच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो.