Dream Girl Trailer: हेमा मालिनीला नाही तर आयुष्मानला म्हणाल 'ड्रीम गर्ल'

Dream Girl Trailer: हेमा मालिनीला नाही तर आयुष्मानला म्हणाल 'ड्रीम गर्ल'

आयुष्मान खुराना आणि अन्नू कपूरची हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट- आयुष्मान खुरानाची (Ayushmann Khurrana) सध्या चलती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आयुष्मान जो सिनेमा करतो तो हिट होतोच असं काही समीकरणच झालं आहे. नुकताच त्याच्या ड्रीम गर्ल (Dream Girl) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात त्याच्यासोबत 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) आहे. पण, ड्रीम गर्लची व्यक्तिरेखा नुसरतऐवजी आयुष्मानच्या वाट्याला आली आहे. 2 मिनिट 52 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये आयुष्मान मुलींच्या व्यक्तिरेखा करतानाच दिसतो. त्यातही नोकरीत तो पूजा नावाच्या एका मुलीच्या व्यक्तिरेखेत असतो जी पुरुषांशी फोनवर प्रेमाने बोलत असते.

बालाजी मोशन पिक्चरच्या बॅनरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ड्रीम गर्लचं लेखन आणि दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं आहे. सिनेमात आयुष्मान आणि नुसरतसोबत अन्नू कपूर, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग, निधी बिष्ट, राजेश शर्मा आणि राज भंसाली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा एक जबरदस्त कॉमेडी ड्रामा आहे. यात आयुष्मानच्या कॉमिक टायमिंगवर लोक फिदा झाले आहेत.

अन्नू कपूर यांनी आयुष्मानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे तर विजय राज यांनी पूजाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. येत्या 13 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. इथे पाहा ट्रेलर-

आयुष्मान जेव्हा सीता आणि राधा होतो-

या दिवाळीला आयुष्मानने सर्वांना पोट धरून हसवण्याचा निश्चयच केला आहे. या सिनेमाचा विषय जुना असला तरी याला नव्या मसाल्यांची फोडणी देण्यात आली आहे. एका मध्यम वर्गीय कुटुंबातल्या मुलाची व्यक्तिरेखा आयुष्मान साकारत आहे. तो रामलीला, कृष्णलीला आणि महाभारतमध्ये सीता, राधा आणि द्रौपदीचीच भूमिका साकारताना दिसत असतो. स्टेजवर महिलांच्या भूमिका साकारत असताना तो एक दिवस 'मीठी बातें' या कॉल सेंटरमध्ये कामाला लागतो.

या कॉल सेंटरमध्ये त्याला मुलीच्या आवाजात बोलायचे असते. त्याच्या बोलण्याच्या अदांवर संपूर्ण शहर वेडं होतं आणि प्रत्येकजण त्याच्या प्रेमात पडतं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर अनेकजण त्याच्यासाठी मारामारीही करतात. यानंतरच सिनेमाची कथा सुरू होते. ट्रेलर पाहताना तुम्हाला अनेक सीन पाहून हसायला येतं.

बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येते ती फक्त हेमा मालिनी. 1977 मध्ये आलेल्या ड्रीम गर्ल या सिनेमानंतरच लोकांनी हेमा मालिनी यांना हे नाव दिलं होतं. या सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण आता आयुष्मान खुरानाने ड्रीम गर्लची पूर्ण परिभाषाच बदलली आहे.

या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीत गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले....

पुरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश- जेनेलिया देशमुख, केली 25 लाखांची मदत

VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या