मुंबई, 12 ऑगस्ट- गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर, सांगलीमध्ये पावसाने जो थैमान घातला त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं. आता पाऊस थांबला असून अनेक भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक कलाकार मंडळींनी कोल्हापुर आणि सांगलीकरांसाठी मदतीचा हात पुढे केला. अनेकांनी आवश्यक धान्य, औषधं, कपडे देऊ केले. यात मराठी कलाकारांनीही खारीचा वाटा उचलला. मदत करणाऱ्यांच्या यादीत आता बॉलिवडू स्टार रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखच्या नावाचा सहभाग झाला आहे. देशमुख पती- पत्नींनी पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर अकाउंटवरून यासंबंधी माहिती दिली. रितेशने 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला. फडणवीस यांनी रितेश- जेनेलियाच्या या कामाचं भरभरून कौतुक केलं. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांचं योगदान दिलं. मी त्यांचा आभारी आहे.'
Thank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
@Riteishd @geneliad pic.twitter.com/Y6iDng2epD
Loading...— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019
दरम्यान, सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांच्या मदतीकरता मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार पुढे सरसावले आहेत. पुणे मुंबई ठाण्यात 8 मदत केंद्रं सुरू करून अन्न पदार्थ, कपडे, औषधं अशा वस्तूंचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यात सुबोध भावे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांनी रविवारी हजर राहून याचा आढावा घेतला. सई ताम्हणकरनं अशा वेळी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. कोण किती मदत करतंय, कोण करत नाहीये याची शहानिशा करायची ही वेळ नाही असंही सई म्हणाली. एकीकडे मराठी कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले असताना बॉलिवूडकरांनी सपशेल निराशा केली. आतापर्यंत एकाही बॉलिवूड कलाकाराकडून मदत आली नाही.
या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा
मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीत गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले....
पुरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश- जेनेलिया देशमुख, केली 25 लाखांची मदत
VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा