मुंबई, 16 ऑक्टोबर : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ (Viral Video on Social Media) कधीकधी सुखावणारे असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकप्रकारे आनंद देणारे असतात. निसर्गाची किमया दाखवणारे अनेक व्हिडीओ तर तुम्हाला अनेक जणांकडून फॉरवर्ड केले जात असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
रितेशने त्याच्या ट्विटरवर बोलिव्हियातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'Salar de Uyuni' चा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये जणू असा भास होत आहे की स्वर्ग आणि पृथ्वीचा संगम याठिकाणी झाला आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'बोलिव्हियातील Salar de Uyuni चा हा व्हिडीओ. हे एक असे ठिकाण आहे जिथे स्वर्ग आणि पृथ्वी भेटतात असे म्हटले जाते. याठिकाणच्या हवेत मीठाचं प्रमाण असतं, वर्षभर इथे कोरडं वातावरण असतं. परंतु याठिकाणच्या पावसाळ्यात, सॉल्ट फ्लॅटचा एक प्रकारे आरसा बनतो, ज्यामध्ये संपूर्ण लँडस्केपचे प्रतिबिंब दिसते.'
(हे वाचा-अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही तरुण सायकलिंग करत आहेत आणि त्याचे सुंदर प्रतिबिंब जमिनीवर दिसत आहे. सायकलिंग पाहणं देखील इतकं आल्हाददायक असू शकतं हे हा व्हिडीओ पाहून जाणवतं. त्याचप्रमाणे या जागेमध्ये निसर्गाची एक वेगळीच किमया पाहायला मिळते. डोंगराचं प्रतिबिंब देखील आकर्षित करणारं आहे.
Salar de Uyuni in Bolivia, it's a place where heaven and earth are said to meet. a natural open-air deposit of salt, remains completely dry most of the year. But in their rainy season,the salt flat becomes a kind of mirror that reflects the entire landscape seen on the ground. pic.twitter.com/CSSp5R53EY
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 15, 2020
रितेश देशमुखच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. पृथ्वीवर अवतरलेला स्वर्ग अशी 'Salar de Uyuni' ची तुलना अनेकांनी केली आहे. या सुंदर ठिकाणी एकदा तरी जायला हवे, अशा प्रतिक्रिया रितेश देशमुखच्या पोस्टवर येत आहेत. 'ट्रॅव्हल प्लॅन'मध्ये ही जागा अॅड केल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.
Unbelievable.. Amazing place wanna go https://t.co/7VUMGVWwRp
— alpana sharma (@to_alpana) October 16, 2020
This is beautiful #NatureIsAmazing@Riteishd https://t.co/ghxubSvLuZ
— Shubh Rawat (@shubhrawat1998) October 16, 2020
Heaven on the earth # Bolivia https://t.co/9zlutASmNm
— Sapna Jha (@SapnaJh08193052) October 16, 2020
95 हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. तर जवळपास 10 हजार जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओचे रिट्विट्स देखील वाढत आहे. रितेश देशमुखच्या चाहत्यांना तर हा व्हिडीओ आवडतच आहे पण त्याचबरोबर निसर्गप्रेमी, बॅगपॅकर्स या व्हिडीओच्या अधिक प्रेमात पडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Riteish Deshmukh, Video viral