'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) फेम रित्विक धनजानी (Rithvik Dhanjani) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मालिकेतील त्याची सहकलाकार आशा नेगी (Asha Negi) आणि रित्त्विकने दीर्घकाळासाठी डेट केले होते, नुकतेच त्यांनी त्यांच्या ब्रेकअप बद्दल जाहीर केले. मात्र त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचे त्यांनी सांगितले होते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@monicadogra/ritvik_d)
आशा आणि रित्त्विक टेलिव्हिजन मधील फेव्हरिट कपल होतं. त्यांच्या ब्रेकअपमुळे अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान हे रित्त्विक आणि मोनिकाचे फोटो समोर आल्यानंतर ते दोघ डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लोकं त्यांच्या फोटोवर कमेंट करून हाच सवाल विचारत आहेत की ते दोघं डेट करत आहेत का . (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@rithvik_d)