Home /News /entertainment /

कंगनानंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने; गृहमंत्र्यांचा थेट चौकशीचा पवित्रा

कंगनानंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने; गृहमंत्र्यांचा थेट चौकशीचा पवित्रा

भाजपप्रणित केंद्र सरकारचा नार्टोटिक्स विभाग (NCB) अभिनेता विवेक ओबेरॉयची (Vivek Oberoi) ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार नसेल, तर मुंबई पोलीस ते स्वतंत्रपणे करतील, असा थेट पवित्रा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे.

    मुंबई, 16 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा (Sushant singh Rajput death case) तपास सुरू असताना उघड झालेल्या बॉलिवूड ड्रग्ज रॅकेज (Bollywood drugs connection) प्रकरणी आता अभिनेता विवेक ओबेरॉयचं (Vivek Oberoi) नाव पुढे आलं आहे. पण ड्रग अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) अद्याप विवेकला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं नाही.  यावर भाजपप्रणित केंद्र सरकारचा नार्टोटिक्स विभाग अभिनेता विवेक ओबेरॉयची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार नसेल, तर मुंबई पोलीस ते स्वतंत्रपणे करतील, असा थेट पवित्रा  ठाकरे सरकारने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना विवेक ओबेरॉयची चौकशी झालीच पाहिजे, असं स्पष्टपणे सांगितलं. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आलं आहे. तो सध्या गायब असल्याने आता त्याच्या तपासासाठी बंगळुरू पोलीस (bengaluru police) मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला. ड्रग्ज (drugs) प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) घरावरही धाड टाकण्यात आली होती. पण अद्याप NCB ने या प्रकरणी चौकशी सुरू केलेली नाही.  विवेक ओबेरॉय हे भाजप संलग्न आहेत म्हणून एन सी बी त्याच्याकडे कारवाई बाबत दुर्लक्ष  करत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणी म्हणाले, "विवेक ओबेरॉय यांच्याबद्दलची सगळी माहिती राज्य सरकारच्या वतीने NCB ला देण्यात आली आहे. आता त्यांनी या प्रकरणी चौकशी केली नाही, तर मुंबई पोलीस ती करतील", असं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने थेट राज्य सरकारशी पंगा घेत अनेक आरोप केले होते. तिला केंद्राचा पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. आता कंगनानंतर विवेक ओबेरॉयवरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आमने सामने येणार असं चित्र दिसत आहे. विवेक ओबेरॉयच्या बायकोचा भाऊ आदित्य अल्वा  हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले. आदित्य अल्वा गायब आहे. तो विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आणि त्याच्या घरी आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं बंगळुरू पोलिसांनी सांगितलं. बंगळुरू पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या जुहूतील घरात पोहोचले. दोन पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी दाखल झाले. तेव्हापासून त्याच्या घरात तपास केला जातो आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Bollywood, Vivek oberoi

    पुढील बातम्या