मुंबई, 06 नोव्हेंबर : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल आता कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. काही महिन्यांपूर्वी या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. त्यानंतर हे दोघंही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. तर दुसरीकडे मुलाखतींमध्येही दोघं एकमेकांबद्दल बिनधास्त बोलताना दिसतात. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वाढदिवसाला अर्जुननं तिच्यासोबतचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं अर्जुनबद्दल अनेक गोष्ट उघडपणे शेअर केल्या. याशिवाय तिनं यावेळी काही धक्कादायक खुलासेही केले. मलायका अरोरानं नुकतीच नेहा धुपियाचा चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं अर्जुन आणि तिच्या नात्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार मलायका अर्जुन बद्दल म्हणाली, ‘अर्जुन प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे मात्र त्याला पैसे सांभाळता येत नाहीत.’ याशिवाय मलायकानं अर्जुन आणि तिच्या लग्नाविषयी सुद्धा यावेळी चर्चा केली. तिच्या बोलण्यावरुन तरी ती लग्नासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे. दिवसातून 6 वेळा खाऊनही अशी फिट राहते दीपिका पदुकोण
ड्रीम वेडिंग बद्दल बोलताना मलायका म्हणाली, ‘माझं ड्रीम वेडिंग बीचवर होईल आणि हे एक व्हाइट वेडिंग असेल. लग्नात मला Elie Saab gown घालायचा आहे आणि माझी गर्ल्स गँग माझ्या ब्राइडमेट्स असतील. मला ब्राइडमेट्स ही संकल्पना खूप आवडते त्यासाठी मला व्हाइट वेडिंग करायचं आहे.’ याआधीही मलायका आणि अर्जुनला त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं गेलं होतं मात्र प्रत्येकवेळी हा विषय त्यांनी टाळला होता. सध्या तरी आम्ही एकमेकांना वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘या’ पॉप सिंगरने सोडलं ग्लॅमरस करियर
अर्जुनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याच्या बहुचर्चित पानिपत सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित सिनेमाच्या ट्रेलर खूप चांगला प्रतिसाद मिळाला मात्र अर्जुनच्या कास्टिंग बद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या अभिनयाचं मात्र सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. ‘बेबी को तो कॉफी पसंद है’, सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनुष्का ट्रोल ============================================================ पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

)







