जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : ...आणि 'ती' रणवीर सिंहला म्हणाली, 'भाभी मत कहना प्लीज'

VIDEO : ...आणि 'ती' रणवीर सिंहला म्हणाली, 'भाभी मत कहना प्लीज'

VIDEO : ...आणि 'ती' रणवीर सिंहला म्हणाली, 'भाभी मत कहना प्लीज'

एका लग्न सोहळ्यात रणवीर सिंहनं एका महिलेला भाभीजी म्हणून हाक मारली आणि त्यानंतर जे झालं. पाहा व्हिडीओ

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 नोव्हेंबर : बॉलिवूडन अभिनेता नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्यानं नवा लुक सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आता त्याचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर एका महिलेसोबत दिसत आहे. हा टिक टॉक व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातला असल्याचं बोललं जात आहे. या लग्नात रणवीरनं डान्स परफॉर्म केला होता. त्या ठिकाणी त्याला एक महिला भेटली तिला रणवीरनं भाभी म्हणून हाक मारली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रणवीर सिंहच्या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही गुनित विरदी आहे. ही महिला एक सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट असल्याचं बोललं जात आहे आणि या महिलेलाच रणवीरनं भाभी म्हणताना दिसत आहे. तिनं हा व्हिडीओ सोशल मीडिया शेअर करताना लिहिलं, ‘जब रणवीर आपको भाभी बुलाएं. दिल के अरमां आंसुओं में बह गए’ हा व्हिडीओ आतापर्यंत हजरो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. रणवीर त्या महिलेला भाभी का म्हणत आहे हे तर समजत नाही पण तो तिला चांगल्याप्रकारे ओळखतो एवढं मात्र समजतं. ‘अर्जुनला पैसे सांभाळता येत नाहीत’, मलायका अरोरानं व्यक्त केली नाराजी गुनित विरदी यांना रणवीर दिल्लीच्या एका लग्न सोहळ्यात भेटला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी ती महिला त्याच्या बाजूला उभी राहिली. याच दरम्यान रणवीरनं तिला भाभी म्हणून हाक मारली. रणवीरनं भाभी म्हटलेलं ऐकून ही महिला जोरजोरात ओरडू लागली आणि तिनं रणवीरला भाभी म्हणू नकोस असं सांगितलं. त्यानंतर तिथं उपस्थित असलेले सर्वचजण तिला भाभीजी म्हणून चिडवू लागले. बालकलाकराला अपशब्द वापरल्यानं स्वरा भास्कर ट्रोल, पाहा VIRAL VIDEO रणवीरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर रणवीर सिंहचा ‘83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकरत आहे. तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो अक्षय कुमारच्या सूर्यवंशीमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दिवसातून 6 वेळा खाऊनही अशी फिट राहते दीपिका पदुकोण =========================================================================== पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात