शाहरुखच्या सिनेमातील आयटम साँगचं शूट करताना रक्तबंबाळ झाली अभिनेत्री!

ही अभिनेत्री आयटम साँगचं शूट करत होती मात्र शूटिंग दरम्यान तिला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 12:33 PM IST

शाहरुखच्या सिनेमातील आयटम साँगचं शूट करताना रक्तबंबाळ झाली अभिनेत्री!

मुंबई, 06 नोव्हेंबर : बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. वयाच्या 45व्या वर्षीही मलायकाचा फिटनेस सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देतो. अर्थात यासाठी ती तेवढी मेहनतही करते. काही दिवसांपूर्वी मलायकानं तिच्या सिने करिअरचा अनुभव एका कार्यक्रमात शेअर केला. त्यावेळी तिनं तिच्या एका आयटम साँगबाबतचा अनुभव सर्वांशी शेअर केला. शाहरुख सोबत शूट केलेल्या 'चल छैयां-छैयां' या गाण्यावर डान्स करताना गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं. ज्यामुळे सेटवर सगळीकडे गोंधळ उडाला होता.

दबंग, हाऊसफुल्ल यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या आयटम साँगमुळे चर्चेत राहिलेल्या मलाकानं आता पर्यंत अनेक सुपरहीट आयटम साँग दिली आहेत. पण करिअरच्या सुरुवातीला 1998 मध्ये तिनं शाहरुख खानचा सिनेमा ‘दिल से’ या सिनेमत पहिलं आयटम साँग केलं होतं. ज्यामुळे ती लाइम लाइटमध्ये आली. हे गाणं होतं 'चल छैयां-छैयां' ज्यामध्ये मलायकानं शाहरुखसोबत चालत्या ट्रेनवर उभं राहून शूट केलं होतं.

बालकलाकराला अपशब्द वापरल्यानं स्वरा भास्कर ट्रोल, पाहा VIRAL VIDEO

Loading...

 

View this post on Instagram

 

🌞🌻🌼☀️..,.. #thursdaythrowback

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव मलायकानं नुकत्याचं एका डान्स रिअलिटी शोच्या मंचावर शेअर केला. मलायका म्हणाली, या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मी अनेकदा पडले होते. चालती ट्रेन, जोराचा वारा आणि ट्रेनवर उभं असताना मला सतत डाव्या आणि उजव्या बाजूला झुकून संतुलन ठेवायचं होतं. अशात घागरा घालून डान्स करणं माझ्यासाठी खूप कठीण जात होतं. त्यावर उपाय म्हणून माझ्या घागऱ्याला कमरेत दोरी बांधण्यात आली.

दिवसातून 6 वेळा खाऊनही अशी फिट राहते दीपिका पदुकोण

मलायका पुढे म्हणाली, ‘अशाप्रकारे दोरी बांधून मी शूट सुरू ठेवलं. पण जेव्हा ती दोरी सोडण्यात आली त्यावेळी त्याच्यामुळे माझ्या कमरेवर त्याच्यामुळे कट आले होते. ज्यामुळे त्यातून रक्तही येऊ लागलं होतं. हे पाहिल्यावर संपूर्ण टीम घाबरली होती. कोणीही काहीही करत होतं. काहीही बडबडत होतं.’

मलायकाची मेहनत कामी आली आणि गुलजार यांनी लिहिलेलं आणि ए. आर. रेहमान यांचं संगीत असलेलं हे गाणं जेव्हा रिलीज झालं त्यावेळी ते खूप जास्त लोकप्रिय ठरलं. आजही हे गाणं मलायकाच्या सिने करिअरमधील सर्वात लोपकप्रिय गाणं म्हणून ओळखलं जातं. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खाननं केली होती. तर हे गाणं चालत्या ट्रेनवर शूट करण्याची संकल्पना दिग्दर्शक मणिरत्न यांची होती.

न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर 'या' पॉप सिंगरने सोडलं ग्लॅमरस करियर

==========================================================

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...