• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shocking Eviction : बिग बॉस मराठीच्या घरातील सारंगे गर्ल स्नेहा वाघ आऊट

Shocking Eviction : बिग बॉस मराठीच्या घरातील सारंगे गर्ल स्नेहा वाघ आऊट

आज मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या घऱात प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी मतांमुळे एका स्पर्धकाला घरातून बाहेर जावं लागंत. यावेळी देखील मीरा व स्नेहा वाघ ( Sneha Wagh) डेंजर झोनमध्ये आहेत. घरातल्यांच्या मते स्नेहा यावेळी घरातून बाहेर जाईल. मीराच्या तुलनेत स्नेहा वीक असल्याचे घरातील स्पर्धकांचे मत आहे. त्यामुळे या दोघींपैकी घरातून कोण बाहेर जाणार याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. बिग बॉस मराठीचा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप 10 दस्य. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले... घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष होते गायत्रीवर नाराज तर, विकास आणि सोनालीमध्ये दखील झाले भांडण… दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणाल्या कारणाने मीरा आणि विशालला भोगावी लागली कारागृहाची शिक्षा... गायत्री दातार बनली घराची कॅप्टन... हे सगळं घडत असतानाच घरामध्ये काही खास पाहुण्यांची एंट्री झाली.
  घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, Sonaliला, सांगितली. तर दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले. कालच्या भागामध्ये या सदस्यांमध्ये गायत्री, सोनाली सेफ झाली आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा आणि दादूस डेंजरमध्ये गेले. आज मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. वाचा : गोविंदाच्या नावावर सुरू होता हा धक्कादायक प्रकार; समजल्यानंतर घेतला मोठा निर्णय महेश मांजरेकर यांनी स्नेहा वाघचा घरातला प्रवास संपल्याचे जाहीर केलं. त्यामुळे घरातील मंडळी भावूक झाली. यावेळी जयने तिला मिठ्ठी मारत तिला चॉकलेट दिली. घऱातून बाहेर येताच तिनं सांगितलं मी, सर्वात जास्त दादूसला मिस करेल असे सांगितले. याशिवय जय दुधाणे याच्याशी माझी चांगली मैत्री झाल्याचे देखील तिनं सांगितलं. स्नेहा वाघ घरात आल्यापासून चर्चेत होती. तिच्या सारंगे बिग बॉस यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. सांरगे म्हणजे I love u...बिग बॉस. सोशल मीडियावर यामुळे ती ट्रोल देखील झाली. वाचा: 'घाई गडबडीत उलटं ब्लाऊज घातलंस का ?'; आलिया भट्ट कपड्यावरून होतेय ट्रोल कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी आपल्या कलर्स मराठीवर.
  Published by:News18 Trending Desk
  First published: