मुंबई, 21 नोव्हेंबर- गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडची मोस्ट पॉप्युलर एक्ट्रेस आलिया भट्ट हिच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहे. आलियानं अजून लग्न केलं नसलं तरी आता तिच्या मैत्रिणीच्या म्हणजे अनुष्का रंजनच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लग्नाच्या या संगीत सोहळ्यात आलिया भट्टनं (Alia Bhatt) लाइम ग्रीन आणि पिंक कलरचा लेहेंगा घातला होता. तर या लेहेंग्यावर तिन क्रास नेकचं ब्लाऊज घातलं होतं. मात्र या ब्लाऊजचं डिजाईन मात्र लोकांना काहीसं पटलेलं नाही. नेटकऱ्यांनी तिला या कपड्यावरून ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
आलिया भट्टचा ट्रेडिशनल लुक चाहत्यांना नेहमीच घायाळ करतो. मात्र आलियाने फॅशनच्या नादात असं काही ब्लाऊज घातलं ज्यामुळे ती थेट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ती या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे मात्र नेटकऱ्यांना तिचा हा लुक रुचलेला नाही.
वाचा : कुसूम मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा
नेटकऱ्यांनी आलिया केलं ट्रोल
काल अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड एक्टर आणि एक्ट्रेसनी हजेरी लावली होती. अनुष्का रंजन आणि आदित्य सील दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघेही आज म्हणजेच 21 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. सोशल मीडियावर अनुष्का रंजनच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आलियाचा लुक पाहून नेटकऱी तिच्या ब्लाऊज कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, घाई गडबडीत हिनं उलटे ब्लाऊज घातलं. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, हा कसाल ब्लाऊज आलियानं घातला आहे. फॅशनच्या नावाखाली कायपण खपवतात..अशा कमेंट नेटकऱ्यांनी आलियाच्या या लुकवर केल्या आहेत.
View this post on Instagram
अशा अनेक कमेंट आलियाच्या या लुकवर आल्या आहेत. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, आलिया भट्ट कधीपासून उर्फी झाली. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, आजच्या जमान्यात जेवढी अश्लीलता कराल तीच फॅशन म्हणून चर्चेत येते. तर एकाने म्हटलं आहे की, उर्फीचा आऊटफीट आलियाने कॉफी केला आहे. तर काहींनी तिचा हा लुक आवडलेला देखील आहे.
वाचा : Virat Kohli ने पत्नी अनुष्कासोबत सेल्फी शेअर करत सांगितली खास गोष्ट
बॉलिवूड सिताऱ्यांची हजेरी
या दोन्ही कलाकारांच्या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूडचे अनेक मोठे चेहरे या कार्यक्रमाचा भाग बनले. या कार्यक्रमाचे अनेक सुंदर व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये आलियाशिवाय अनेक कलाकारही डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
ट्रोलर्सच्या कमेंटवर आलियाची प्रतिक्रिया कशी असते ?
यापूर्वीही आलियाला कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र यापूर्वी तिनं याविषयी यूट्यूब व्हि़डीओवर सांगितलं आहे की, ती ट्रोलर्सच्या कमेंटना मनावर घेतन नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Bollywood News, Entertainment