जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / गोविंदाच्या नावावर सुरू होता हा धक्कादायक प्रकार; समजल्यानंतर घेतला मोठा निर्णय

गोविंदाच्या नावावर सुरू होता हा धक्कादायक प्रकार; समजल्यानंतर घेतला मोठा निर्णय

गोविंदाच्या नावावर सुरू होता हा धक्कादायक प्रकार; समजल्यानंतर घेतला मोठा निर्णय

सोशल मीडियाचा वापर करून अनेक फसवणुकीचे प्रकार आपल्या आजू बाजूला घडत असतात. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या नावाचा वापर करून असाच एक प्रकार सुरू होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 नोव्हेंबर : सोशल मीडियाचा वापर करून अनेक फसवणुकीचे प्रकार आपल्या आजू बाजूला घडत असतात. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या नावाचा वापर करून असाच एक प्रकार सुरू होता. जेव्हा अभिनेता गोविंदाला (Govinda) आपल्या नावाने फेक न्यूज चालवल्या जात असल्याचे समजले तेव्हा त्याला चांगलाच धक्का बसला. यावर गोविंदाने तात्काळ कारवाई करत सोशल मीडियावर चाहत्यांना सतर्क केले. नुकतेच गोविंदाच्या लक्षात आले की, त्याच्या नावाने जाहिरात देऊन एक बनावट**(Govinda fake news meet and greet event)** घोटाळा, प्लान केला जात आहे. 20 डिसेंबरला लखनऊमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात चाहत्यांना त्यांचा आवडता अभिनेता गोविंदाला भेटण्याची सुवर्णसंधी मिळू शकते, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. मात्र गोविंदा अशा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग नाही किंवा त्याच्याकडे त्याची कोणतीही माहिती नाही. वाचा : ‘अभी बोल क्या करेगा तू…’, Bigg Boss 15 मध्ये अभिजित बिचुकलेची स्टाईल पाहून सलमान ही दचकला सोशल मीडियावरील या व्हायरल जाहिरातीवर गोविंदाची नजर पडताच त्याने चाहत्यांना सतर्क केले. त्याने ही जाहिरात आपल्या इंस्टाग्राम**(Govinda Instagram)** स्टोरीवर शेअर केली आणि लिहिले की, ही खोटी बातमी आहे. या फेक व्हायरल जाहिरातीत लिहिले आहे, ‘ई लाइट प्रॉडक्शनचा बिझनेस ऑर्गनायझिंग अवॉर्ड. गोविंदाजींना भेटण्याची सुवर्ण संधी. भेटा, गोविंदाजींसोबत जेवा. तुमच्या लखनऊशहरात.’ यामध्ये 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी दोन मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. govinda fake news गोविंदाच्या कामाबद्दल सांगायचे तर, गोविंदाने नुकतेच त्याचे ‘टिप टिप बरसा पाणी’ ’ (Govinda tip tip barsa pani) हे गाणे रिलीज केले, ज्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. गोविंदाने त्याच्या ‘गोविंदा रॉयल्स’ या यूट्यूब चॅनलवर ते रिलीज केले. विशेष म्हणजे हे गाणे गोविंदानेच स्वत: लिहिले आणि गायले आहे.  अनेकवेळा अशा सेलेब्सचा नावाचा वापर करून लोकांना फसवलं जातंं. गोविंदाच्या वेळेत लक्षात आल्याने त्याने चाहत्यांना लगेच सतर्क करत एक चांगाला निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात