'या गाण्यात संगीत नाही'; गायक शानने हनी सिंगची नाव न घेता उडवली खिल्ली

'या गाण्यात संगीत नाही'; गायक शानने हनी सिंगची नाव न घेता उडवली खिल्ली

गेल्या काही वर्षांत हिंदी म्युझिकची पातळी ढासळली आहे, असं गायक शानचं (Shaan) म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक शान (Shaan) याने प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगच्या (YoY o  honey singh) गाण्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ‘चार बोतल वोडका’ (char bottle vodka) , सनी सनी (sunny sunny) , लुंगी डान्स (Lungi dance) या गाण्यांमध्ये संगीत कुठेच नाही असं शानचं म्हणणं आहे. हनी सिंगचं नाव न घेता त्याने या गाण्यांवर टिप्पणी केली आहे.

शानने एका वेबसाईटला दिलेल्या वृत्तानुसार शानचं म्हणणं आहे की, गेल्या काही वर्षांत हिंदी म्युझिकची पातळी ढासळली आहे. पुढे तो म्हणतो, "संगीताची समज किती लोकांना आहे. खूप कमी. आपण सगळ्यांना संगीताचं शिक्षण देऊ शकत नाही. पण आपण आपल्याकडून चांगलं संगीत देण्याचा प्रयत्न करू शकतो. हळू हळू त्याची एक टेस्ट तयार होइल. पण सगळ्यात सोपा उपाय हा आहे की मी तुमच्या पातळीवर उतरू”.

हे वाचा - 'राधे'नंतर आता Tiger 3 चं काय? सलमानच्या बहुप्रतीक्षित फिल्मबाबत समोर आली मोठी माहिती

शान पुढे बोलताना सांगतो की, "आज रॅप म्युझिक इतक फेमस का आहे? आपल्याला वाटत शिव्या देतो म्हणून?  नाही. कारण त्यात संगीतासारखी गोष्टच नाही. जर कोणी गाणं बनवत असेल, 'चार बोतल वोडका, काम मेरा रोजका', हे तुम्हीही गाऊ शकता. 'आज ब्लू है पानी पानी', 'लुंगी डान्स लुंगी डान्स', हे तुम्हीही करू शकता. तर काही रॅप सिंगर हे अतिशय उत्कृष्ट आहेत पण लोकप्रिय हिंदी रॅप सोपे आहेत."

हे वाचा - ‘केवळ 10 मिनिटांसाठी भेटशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर कियारा म्हणाली...

रॅप गायक यो यो हनी सिंग अनेक दिवस रॅपपासून दूर होता पण जानेवारीत त्याचं नव गाणं लाँच झालं होतं. त्या गाण्याला श्रोत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता. लोकप्रिय गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)  सोबत त्याने हे गाणं केलं होत. ‘सइया’ (saiyaan) असं हें गाणं असून अवघ्या काही दिवसातच हे गाणं लोकप्रिय झालं.

Published by: News Digital
First published: April 16, 2021, 1:25 PM IST

ताज्या बातम्या