'राधे'नंतर आता Tiger 3 चं काय? सलमानच्या बहुप्रतीक्षित फिल्मबाबत समोर आली मोठी माहिती

'राधे'नंतर आता Tiger 3 चं काय? सलमानच्या बहुप्रतीक्षित फिल्मबाबत समोर आली मोठी माहिती

अभिनेता सलमान खानची (actor Salman Khan) राधे (Radhe) आणि टायगर 3 (Tiger 3) या फिल्मची त्याच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : कोरोना आणि लॉकडाऊन याचा फटका बॉलिवूडलाही बसला आहे. अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. काही फिल्मचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे, काही फिल्मचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यात अभिनेता सलमान खानच्या (actor Salman Khan) बहुप्रतीक्षित राधे (Radhe) फिल्मचाही समावेश आहे. त्यानंतर आता सलमानची दुसरी फिल्म  टायगर 3 (Tiger 3) चं काय होणार याची चर्चाही रंगत होती. याबाबतच आता मोठी माहिती समोर येते आहे.

अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित (Tiger) चित्रपटाचा सिक्वल Tiger 3 लवकरच येणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. ज्याचं शूटिंग सुरू आहे. पण कोरोनासदृश (Corona) परिस्थिती संपत नसल्याने अनेक चित्रपटांचं चित्रीकरण तसंच या फिल्मचंही चित्रीकरण रखडलं आहे. या फिल्मची अभिनेत्री कतरिना कैफही कोरोना पॉझिटिव्ह झाली. त्यानंतर आता या फिल्मचं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

बॉलिवूड हंगामा (Bollywood Hungama) वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान टायगर 3 च्या शेवटच्या टप्प्यातील चित्रिकरणासाठी रशियाला (Russia) जाणार आहे.

हे वाचा - सोनू सूदचा निर्धार; गरीब रुग्णांसाठी बांधतोय नवं हॉस्पिटल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे निर्माते टायगर 3 ला आधीच्या दोन चित्रपटांपेक्षा (Tiger and Tiger zinda hai) भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी काही अनोखी स्थळं चित्रिकरणासाठी (exotic places for shooting) निवडली आहेत. त्यासाठीच सलमान आणि त्याची टीम लवकरच रशियाला रवाना होणार आहेत. जून किंवा जुलै महिन्यात अनुकूल परिस्थिती लक्षात घेऊन ते रशियाला  जाणार आहेत.

कोणत्या प्रकारचं शूट हे रशियात होणार आहे हे समजलं नसलं तरी चित्रपट हा संपूर्ण अॅक्शन सिन्सने (Action movie)  भरलेला असणार आहे यात शंका नाही.

हे वाचा - 'शराबी'मध्ये BIG B यांचा हात खिशातच का होता? 36 वर्षांनंतर सांगितलं कारण

सलमान खानसोबत या फिल्ममध्ये अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) देखील असणार आहे. तर या सिक्वलमध्ये अभिनेता इमरान हाश्मीही (Imran Hashmi)  दिसणार आहे. इमरानचीदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे. दिग्दर्शक मनीष शर्मा (Manish Sharma) चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Published by: News Digital
First published: April 15, 2021, 9:56 PM IST

ताज्या बातम्या