“कियारा मॅडम माझ्या आदर्श आहेत. त्यांना भेटणं माझ्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा क्षण असेल. ते माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं असेल. या वेळेस कियारा मॅडम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला आल्या होत्या पण मी त्यांना भेटू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस मी त्यांना नक्की भेटेन. माझं स्वप्न लवकरचं पूर्ण होईल अशी आशा करतो. मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे.” अशा आशयाचं ट्विट या चाहत्यानं केलं होतं.
तिनं “स्वप्न पूर्ण सुद्धा होतात आणि होतील, लवकरच.” अशा आशयाची प्रतिक्रिया देत चाहत्याला आनंदाचा धक्का दिला.
कियारानं दिलेल्या या उत्तरानं तो चाहता प्रचंड खूष झाला. त्याने पुन्हा तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुमची प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कियारा मॅडम माझ्याकडे तुमचे प्रत्येक ट्विट सेव्ह आहेत जे तुम्ही लाईक केलेले आहेत.”