मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /KK Funeral: हम रहें ना रहें, याद आयेंगे! गायक केके अनंतात विलीन

KK Funeral: हम रहें ना रहें, याद आयेंगे! गायक केके अनंतात विलीन

KK Funeral: हम रहें ना रहें, याद आयेंगे! गायक केके अनंतात विलीन

KK Funeral: हम रहें ना रहें, याद आयेंगे! गायक केके अनंतात विलीन

प्रसिद्ध गायक केकेचा मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. आज मुंबईच्या वर्सोवा स्मशानभूमी येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अनेक वर्ष आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा केके आज अखेर अनंतात विलीन झाला. (KK Funeral)

पुढे वाचा ...

मुंबई, 02 जून: प्रसिद्ध गायक 'कृष्णकुमार कुन्नथ' उर्फ 'केके' (KK  Death)  याचा मंगळवारी 31 मे रोजी कोलकत्ता येथे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज केकेवर मुंबईतील वर्सोव्याच्या (Varsova) येथील हिंदू स्मशानभूमीत  दुपारी २ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले (SINGER KK Funeral) अनेक वर्ष आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा केके आज अखेर अनंतात विलीन झाला. केकेचा मुलगा नकुल यानं केकेवर अंतिमसंस्कार केले. केकेचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची नोंद करण्यात आली होती परंतू पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झालं.  केकेचं पार्थिव आज सकाळी  एअर इंडियाच्या (Air India) विमानाने कोलकत्त्याहून (Kolkata) मुंबईत  (Mumbai)आणलं गेलं. सकाळी 10 ते 12:30 या वेळात केकेचं पार्थिव  वर्सोव्याच्या प्लार्क प्लाझामध्ये (Park Plaza) अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. केकेचं अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक गायक आणि कलाकार उपस्थित होते. केकेच्या चाहत्यांनी त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

दुपारी 1 वाजता केकेच पार्थिव पार्क प्लाझायेथून वर्सोवा स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झालं. फुलांनी सजवलेल्या गाडीतील केकेचं पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेने नेण्यात आलं.  वयाच्या 53 व्या वर्षीय केकेच्या जाण्यानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. केकेच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.  केकेच्या निधनाची बातमी कळताच त्याची पत्नी ज्योती आणि मुलं तात्काळ कोलकत्ता येथे पोहोचले.  रुग्णालयातून केकेचं पार्थिव  कोलकत्ता येथील रवींद्र सदनमध्ये आणण्यात आलं.

90चा काळ गाजवणारा सर्वांचा लाडका गायकाचा अशाप्रकारे झालेला अंत सर्वांच्या जिव्हारी लागून गेलाय. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांचे अश्रू अनावर झाले होते. गायक अभिजीत भट्टाचार्य, गायिका श्रेया घोषाल, जावेद अली, अलका याज्ञी, जावेद अख्तर, शंकर महादेवन आदी कलाकार आणि गायकांनी लाडक्या केकेला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा - KK demise: बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीसोबत KK ने एका मराठी गाण्यालाही दिला होता प्लेबॅक!

यावेळी ज्येष्ठ गायक 'अभिजीत भट्टाचार्य' (Abhijeet Bhattacharya)  यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'अशा प्रकारच्या मोठ्या ऑडिटोरिअममध्ये एक रुग्णवाहिका आणि मेडिकल सुविधा असणं गरजेचं आहे. जर या सुविधा तिथे उपलब्ध असत्या तर केकेला अस्वस्थ वाटत असताना त्याला हॉटेलला जाव लागलं नसतं. तो थेट रुग्णालयात गेला असता'.

अभिजीत भट्टाचार्य पुढे म्हणाले, 'मी कधी कोणाचा फॅन होत नाही. पण किशोर कुमार यांच्यानंतर मी केकेचा फॅन होतो आणि मी नेहमी त्याचा फॅन राहिन. मीच नाही माझा मुलगाही केकेची गाणी गाण्याचा प्रयत्न करतो'.

हेही वाचा - इतक्या कोटींचे मालक होते KK, एका गाण्यासाठी घेत होते तब्बल इतकं मानधन

'खुदा जाने', 'तू ही मेरी शब है', 'तडप-तडप के' आणि 'यारों दोस्ती..' ही गाणी आजही कायम लोकांच्या ओठावर असतात. केके यांनी हिंदीशिवाय इतर अनेक भाषांतील गाण्यांना आवाज दिला. त्यांनी तेलुगू, तमीळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. संपूर्ण कारकिर्दीमध्ये केके यांनी जवळपास 25 हजारपेक्षाही जास्त गाणी गायली.

First published:

Tags: Bollywood News, Funeral, Kolkata, Mumbai, Singer, Song