मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /इतक्या कोटींचे मालक होते KK, एका गाण्यासाठी घेत होते तब्बल इतकं मानधन

इतक्या कोटींचे मालक होते KK, एका गाण्यासाठी घेत होते तब्बल इतकं मानधन

बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक कृष्ण कुमार कुन्नाथ (Krishnakumar Kunnath) उर्फ केके यांचं काल 31 मे 22 रोजी रात्री आकस्मिक निधन (Death) झालं. कृष्ण कुमार इंडस्ट्रीमध्ये केके (KK) या नावाने प्रसिद्ध होते.

बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक कृष्ण कुमार कुन्नाथ (Krishnakumar Kunnath) उर्फ केके यांचं काल 31 मे 22 रोजी रात्री आकस्मिक निधन (Death) झालं. कृष्ण कुमार इंडस्ट्रीमध्ये केके (KK) या नावाने प्रसिद्ध होते.

बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक कृष्ण कुमार कुन्नाथ (Krishnakumar Kunnath) उर्फ केके यांचं काल 31 मे 22 रोजी रात्री आकस्मिक निधन (Death) झालं. कृष्ण कुमार इंडस्ट्रीमध्ये केके (KK) या नावाने प्रसिद्ध होते.

   मुंबई, 1 जून-   बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक कृष्ण कुमार कुन्नाथ (Krishnakumar Kunnath) उर्फ केके यांचं काल 31 मे 22 रोजी रात्री आकस्मिक निधन (Death) झालं. कृष्ण कुमार इंडस्ट्रीमध्ये केके (KK) या नावाने प्रसिद्ध होते. कोलकत्यामध्ये सुरू असलेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live concert) अचानक त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर ते कार्यक्रमामधूनच हॉटेलवर गेले. तिथेही त्यांना त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली. त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची (Singer KK Death) बातमी कळताच बॉलिवूडपासून संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली. केके यांनी आपल्या गायकीच्या जोरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार केला होता. त्यांच्या चाहत्यांच्या मनात आता त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांची लाईफस्टाईल (Lifestyle) कशी होती.

  केके या नावाने प्रसिद्ध असलेल्या कृष्ण कुमार यांनी आपल्या आवाजाच्या जादूने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 23 ऑगस्ट 1968 रोजी राजधानी दिल्लीमध्ये त्यांच्या जन्म झाला होता. त्यामुळे दिल्ली हे त्यांचं मूळ शहर मानलं जातं. जन्माने हिंदू असलेले केके प्रत्येक धर्माचा आदर करत होते. केके यांनी दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी 1999 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणं गायलं होतं. ते प्रचंड हिट झालं होतं.

  यानंतर त्यांच्या गायन कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांनी हिंदीमध्ये अनेक हिट गाणी गायली. त्यांची 'खुदा जाने', 'तू ही मेरी शब है', 'तडप-तडप के' आणि 'यारों दोस्ती..' ही गाणी आजही कायम लोकांच्या ओठावर असतात. केके यांनी हिंदीशिवाय इतर अनेक भाषांतील गाण्यांना आवाज दिला. त्यांनी तेलुगू, तमीळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. संपूर्ण कारकिर्दीमध्ये केके यांनी जवळपास 25 हजारपेक्षाही जास्त गाणी गायली.

  (हे वाचा:ज्योतीसोबत लग्न करण्यासाठी KK ला करावी लागली होती अशी नोकरी, काही दिवसांपूर्वीच केला होता खुलासा )

  केके यांच्या जीवनशैलीबद्दल बोलायचं झालं तर, केकेंची गणना इंडस्ट्रीतील सर्वांत महागड्या गायकांमध्ये होते. त्याची एकूण संपत्ती 1.5 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. तसंच त्यांना घोडेस्वारीची खूप आवड होती. ते एक गाण गाण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये घेत असत आणि लाइव्ह कॉन्सर्टसाठी 10 ते 15 लाख रुपये घेत असत. ते करोडोंच्या मालमत्तेचे मालक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ऑडी कार खरेदी केली होती.

  (हे वाचा:Singer KK Car collection: आलिशान कारचा शौकीन होता KK, गायकाच्या महागड्या कारचं कलेक्शन; नुकतीच घेतली होती 'ही' महागडी कार)

  केके विवाहित होते. त्यांनी 1991 मध्ये जॉथी कृष्णा नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं आहेत. त्यांच्या मुलाचे नाव कुन्नाथ नकुल आणि मुलीचं नाव कुन्नाथ तमारा आहे. केके यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.2000 च्या दशकापासून आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या केके यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने त्यांचे चाहते (KK Fans) सोशल मीडियावर (Social Media) त्यांची आठवण जागवत आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Bollywood News, Entertainment, Playback singer