मुंबई 1 जून: ‘हम रहे या ना रहे याद आयेंगे यह पल’ असं म्हणणाऱ्या KK ने खरोखरच बॉलिवूडला खूप मोठा धक्का दिला आहे. त्याच्या जाण्याने (Singer KK death) संगीतसृष्टीमध्ये न भरता येणारी पोकळी निर्माण झाली आहे. ज्याच्या गाण्यांवर अनेकांनी कठीण रात्री जागून काढल्या ज्याच्या गाण्यांनी अनेकांना नवी उमेद दिली अश्या KK चा आवाज पुन्हा कधीच ऐकता येणार नाही या दुःखद विचाराचा सामना अवघ्या बॉलिवूडला करावा लागत आहे. अगदी ब्लूटूथच्या जमान्यातील या गायकाच्या आवाजाची जादू एवढी जबरदस्त होती की फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथ आणि सोबतच मराठी इंडस्ट्रीला सुद्धा त्याचा आवाज हवाहवासा वाटायचा. केके यांचं मराठी इंडस्ट्रीशी सुद्धा खूप सुरेल नातं होतं. केके यांनी एका मराठी गाण्याला प्लेबॅक (KK Marathi song) दिला होता. ‘वेड हे लागले’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यातील छोटासा भाग ‘ये ना तू’ अश्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. हे केके यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं गाणं ‘फ्रेंडशिप डॉट कॉम’ या मराठी चित्रपटातील असून केके यांचा मराठीतील डेब्यू या गाण्याने झाला होता. केके यांनी यानंतर एकही मराठी गाणं गायलं नाही याची अनेकांना खंत वाटत आहे.
केके यांचा हातखंडा असलेल्या रोमँटिक जॉनरचं ‘वेड हे लागले’ हे मराठी गाणं होतं. त्यांनी अधिक मराठी गाणी गायला हवी होती अशी इच्छा फॅन्सना होती आणि आता ती पूर्ण होणार नाही याची खंत सगळ्यांनाच आहे. केके यांचं नाव बॉलिवूडसोबत साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होतं. त्यांच्या मराठी चाहत्यांची संख्या सुद्धा मोजता न येणारी आहे. हे ही वाचा- KK Death: बॉलिवूडमधील ‘या’ व्यक्तीने KK ला दिला होता मुंबईत येण्याचा सल्ला कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर त्यांना अचानक बरं वाटेनासं झालं आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या शेवटच्या कॉन्सर्टचे अनेक विडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. केके यांची अजब सी, दिल इबादत, पल, तडप तडप, दिल क्यू यह मेरा, खुदा जाने, अलविदा ही गाणी आजही पसंत केली जातात. त्यांना अश्या पद्धतीने अलविदा करावं लागेल हे कोणालाच स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं.