मुंबई, 2 फेब्रुवारी : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी जामिनावर असलेली, अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांना सोमवारी मुंबईत एका जीमबाहेर स्पॉट करण्यात आलं. या भावा-बहिणीला निवासी इमारतीतून बाहेर पडताना पाहण्यात आलं. यापूर्वी जानेवारीमध्ये रिया आणि शौविक यांना जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले होते. रिया आणि शौविक दोघे भावंडं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) काही महिन्यांसाठी जेलमध्ये होते. रिया आणि शौविकला मुंबईत जीमबाहेर स्पॉट करण्यात आले. याच जीममध्ये रिया आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत एकत्र वर्कआउटसाठी जात असल्याची माहिती आहे. रिया आणि शौविकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात दोघेही जीम आउटफिटमध्ये जीममधून बाहेर येताना दिसत आहेत.
(वाचा - ‘…म्हणून आत्मसन्मान गहाण ठेवून ट्वीटर वापरते’; Kangana Ranaut ने सांगितलं कारण )
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया मुंबईच्या भायखळा जेलमध्ये जवळपास एक महिना होती. रियावर सुशांतच्या बँक अकाउंटमधून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप लावण्यात आला होता. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने ड्रग्ज जवळ बाळगणं आणि ड्रग्ज सेवन करण्याचे पुरावे आढळल्यानंतर रियाला अटक झाली होती.
(वाचा - मुलीला निरोप द्यायला शाहरुख मुंबई विमानतळावर; लुकमुळे चाहत्यांमध्ये चर्चा )
त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी तिला जामिनावर सोडण्यात आलं. तर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीलाही ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला जवळपास तीन महिन्यांनंतर जामिनावर सोडण्यात आलं.

)







