शाहरूखची मुलगी सुहाना गेले काही महिने मुंबईत होती. कोरोना (corona) मुळे तिला मुंबईला यावे लागले होते. मात्र आता ती पुढील शिक्षणासाठी परत एकदा न्युयॉर्कला (New York) रवाना झाली आहे. सुहाना सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. रोजच्या तिच्या नव्या पोस्टमुळे ती कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर (social media) तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहेत. या व्हिडिओमुळे शाहरूखच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. शाहरूख खानच्या फिल्मी करियरविषयी बोलायच झाल तर, तो 2018 मध्ये 'झिरो' (Zero) या त्याच्या सिनेमात दिसला होता. आता तो दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पठान या चित्रपटातून तो आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात त्याची सहकलाकार आहे दीपिका पदुकोन (Deepika Padukone). शाहरूख आणि दीपिका यांचा एकत्र असा हा चौथा चित्रपट असणार आहे. याआधी त्यांनी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यु इयर या चित्रपटात एकत्र काम केल आहे. दोघांनी 'पठान'चं शेड्युल पुर्ण केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deepika padukone, Shahrukh khan, Suhana khan