जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / '...म्हणून आत्मसन्मान गहाण ठेवून ट्वीटर वापरते'; Kangana Ranaut ने अखेर सांगितलं कारण

'...म्हणून आत्मसन्मान गहाण ठेवून ट्वीटर वापरते'; Kangana Ranaut ने अखेर सांगितलं कारण

'...म्हणून आत्मसन्मान गहाण ठेवून ट्वीटर वापरते'; Kangana Ranaut ने अखेर सांगितलं कारण

गेल्या महिन्यात ट्वीटरने कंगना विरोधात कारवाई करत त्यांच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) कंगना रणौत (Kangana ranaut) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्वीटर’वर (twitter) टीका करत असते. पण तरीही ती ट्वीटर वापरण्याचं थांबवत नाही. यामागे तिने एक अनोख कारणं (Unique reason) सांगितलं आहे. तिने म्हटलं की, स्वतःचा आत्मसन्मान गहाण ठेवून ट्वीटर वापरते. कारण ती एक देशभक्त आहे. खरंतर एका ट्वीटर वापरकर्त्याने ट्वीटरवर एक लेख शेअर केला होता. ज्यामध्ये लिहिलं होतं की, ‘भारताचा पाकिस्तान सोबत वाद सुरू असताना भारत पाकिस्तानला कोविड- 19 ची लस पुरवत आहे.’ कंगनाने या ट्वीटला कोट करत लिहिलं की, ‘याच कारणांमुळे आपल्यासारखी लोकं स्वतः चा आत्मसन्मान गहाण ठेवून ‘ट्वीटर’ सारखं विचारशून्य आणि अत्याचारी कम्युनिस्ट व्यासपीठ वापरतो. अशा गोष्टी ते आपल्याला कधीच सांगणार नाहीत, म्हणून आपल्याला सांगावं लागतं, आपण नाही सांगणार तर कोण सांगेल? देशापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही…जय हिंद! गेल्या महिन्यात ट्वीटरने कंगना विरोधात कारवाई करत त्यांच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. कंगनाने त्या संबंधित ट्वीटमध्ये Amazon prime video वर प्रसिद्ध झालेल्या ‘तांडव’ वेब सीरीजवर टीका केली होती. यावेळी तिने लिहिलं होतं की, ‘धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करायला हवा,’ कंगनाच्या या प्रक्षोभक विधानाची दखल घेऊन ट्वीटरने तिच्या विरोधात कारवाई केली होती. कंगनाने आतापर्यंत ट्वीटरवर अनेकांशी पंगा घेतला आहे. अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते असं कोणालाचं तिने सुट्टी दिलेली नाही. तिने ट्वीटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सीलाही खडेबोल सुनावले आहेत. अलीकडेच तिने शेतकरी आंदोलनालाही विरोध केला होता. यावरून ट्वीटरवरील वातावरण चांगलंच पेटलं होतं. यावेळी बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांजने शेतकऱ्यांची बाजू घेवून कंगनाला चांगलंच झापलं होतं. त्यांचा वाद इतका पेटला होता, की काही काळानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात