जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / BB16: शिवला झालेल्या मारहाणीवर भडकली बहिण ; म्हणाली, आज तिनं मान धरली उद्या...

BB16: शिवला झालेल्या मारहाणीवर भडकली बहिण ; म्हणाली, आज तिनं मान धरली उद्या...

शिव ठाकरे

शिव ठाकरे

बिग बॉसच्या घरातील सगळ्या सदस्यांनी शिव ठाकरेबरोबर झालेल्या प्रकाराचा निषेध केला त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येतेय. अशातच शिवची बहिण मनीषा ठाकरे हिनं प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 नोव्हेंबर : बिग बॉसचा 16 सीझन सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसमध्ये असलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरे नं  सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. घरात गेल्यापासून शिव त्याच्या चांगल्या खेळामुळे प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मराठीनंतर हिंदी बिग बॉस मध्ये जाऊनही शिवनं प्रेक्षकांची मनं जिंकली. घरात उत्तम टास्क खेळणारा आणि सगळ्यांना समजून घेणाऱ्या शिवला बिग बॉसच्या घरात मारहाण करण्यात आली. साजिद खान आणि गौरीचं भांडण सुरू असताना मध्ये पडलेल्या शिवला अर्चनानं मारहाण केली. अर्चनानं थेट शिवचा गळा धरल्याचं पाहायला मिळालं. परिणामी अर्चनाला बिग बॉसनं घरचा आहेर दिला आहे. घरातील सगळ्या सदस्यांनी या प्रकाराचा निषेध केला त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येतेय. अशातच शिवची बहिण मनीषा ठाकरे हिनं प्रतिक्रिया देत भावाला झालेल्या मारहाणीचा संपात व्यक्त केला आहे. शिव ठाकरे आणि अर्चना यांच्यात झालेल्या भांडणावर शिवच्या बहिणीशी ई-टाइम्सनं संवाद साधला असता या प्रकाराचा ठाकरे कुटुंबियांना धक्का बसल्याचं तिनं सांगितलं. मनीषा ठाकरे म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात शिवबाबत घडलेली ही घटना मला काल रात्री कळली. तिची ती कृती पूर्णपणे अनावश्यक होती. तुला बोलायचं आहे तेवढं बोल पण कुणावर हात उचलायची गरज नव्हती. तिनं जे केलं ते फार चुकीचं होतं. पण आनंद आहे की शिव मात्र तिच्यासारखी प्रतिक्रिया दिलेली नाही’. हेही वाचा - Bigg Bossच्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरे मारहाण? स्पर्धकाला Bigg Bossनं दाखवला थेट बाहेरचा रस्ता शिव कधीच भान हरपून वागत नाही शिवची बहिण पुढे म्हणाली, ‘शिव माझा भाऊ त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगते की तो कधीही जोशात भान हरपून वागत नाही. तो रागवतो तेव्हा ही चुकीचं वागत नाही. त्याची मर्यादा तो कधीच ओलांडत नाही. राग आला तरी तो नेहमीच नियंत्रणात असतो. प्रसंगी काय करावं आणि काय करू नये हे त्याला बरोबर माहिती आहे’.

जाहिरात

आई वडिलांना वाटतेय शिवची काळजी शिवला झालेल्या मारहाणीचा एपिसोड जेव्हा घरी पाहिला गेला तेव्हा शिवच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला असं बहिणीनं सांगितलं. ती म्हणाली,  ‘हे सगळं पाहिल्यानंतर आई वडिलांना शिवची काळजी वाटू लागली. तो निट असेल ना यानं ते अस्वस्थ झाले होते. मी धावत माझ्या माहेरी निघून आले. आई वडिलांची काळजी पाहून मी तात्काळ चॅनेलला फोन केला. तेव्हा त्यांनी मला शिव ठिक असल्याचं आश्वासन दिलं’.

News18लोकमत
News18लोकमत

तसंच ती म्हणाली, ‘घरातील इतर स्पर्धक शिवच्या बाजूनं होती म्हणजे नक्कीच चूक तिचीच असावी. मारामारी करून एखाद्याला दुखापत करणं किंवा त्याची मान पकडण्याचा प्रयत्न करणं ही मोठी गोष्ट  आहे. आज तिने माझ्या भावाची मान पकडली उद्या ती आणखी कोणत्या वाईट पद्धतीनं माझ्या भावाला मारेल. पण घरातील इतर स्पर्धकांची ज्या प्रकारे शिवला पाठिंबा दिला त्यावरून तरी चूक ही अर्चनाची असावी’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात