मुंबई, 09 नोव्हेंबर : बिग बॉसचा 16 सीझन सध्या टेलिव्हिजनवर हिट ठरत आहे. घरात गेलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरे मुळे शोला चार चांद लागले आहेत. शिव ठाकरे आणि अब्दू यांची घरात चांगलीच केमिस्ट्री रंगली आहे. अनेक प्रेक्षक फक्त शिव ठाकरेसाठी बिग बॉस 16 पाहतात अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. शिव ठाकरेनं देखील त्याच्या साधेपणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकलीत. प्रेक्षकही शिवला प्रचंड प्रेम देत आहेत. सलमान खानकडूनही शिवचं कौतुक करण्यात आलं आहे. असं असताना बिग बॉसच्या घरात मराठमोळ्या शिवशी पंगा घेणं स्पर्धकाला चांगलंच महागात पडलं आहे. टास्क दरम्यान घरातील दोन सदस्यांनी शिव ठाकरेवर हात उचलला. शिव वर हात उचलल्यानं बिग बॉस संत्पत झाले असून स्पर्धकाला बिग बॉसनं थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिववर हात उचलल्यानं सध्या सोशल मीडियावर या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बिग बॉसच्या घरात शिव व्यतिरिक्त अर्चना गौतमनं तिच्या खेळामुळे प्रसिद्धी मिळवली. पण या आठवड्यात खेळत असताना अर्चना तिच्या रागावर ताबा मिळवू शकली नाही. तिच्यात आणि शिव ठाकरेमध्ये वाद झाला. दोघांमध्ये फिजिकल भांडणं झाली. अर्चनानं शिववर हात उचलला असं देखील म्हटलं जातं आहे. या सगळ्यावर बिग बॉसनं कठोर निर्णय घेत अर्चनाला घराबाहेर काढल्याचं सांगितलं जात आहे. घरात भांडण केल्यानं आणि शिव ठाकरेबरोबर फिजिकल भांडणं केल्यानं अर्चनाला बिग बॉसनं घराबाहेर काढलं आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi: शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं? अभिनेत्रीचं उत्तर ऐकून बसेल धक्का
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात सुम्बुल तौकीर खान, गौर नागोरी आणि प्रियंका चाहत चौधरी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. मात्र या प्रकरणानंतर बिग बॉसनं अर्चनाचीच हकलपट्टी केली आहे. अर्चना तर गेली आता या आठवड्यात आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार का हे पाहणं इट्रेस्टिंग ठरणार आहे.
फिजिकल भांडणं केल्यानंतर घराबाहेर जाणारी अर्चना ही पहिली स्पर्धक नाहीये. आधीही बिग बॉसनं अशाप्रकारे सदस्यांना घराबाहेर काढलं आहे. बिग बॉस 13मध्ये मधुरिमा तुला हिला आदित्य सिंहबरोबर भांडण केल्यानं घरातून काढून टाकलं होतं. तर आठव्या सीझनमध्ये पुनीत इस्सर याला देखील बिग बॉसनं घराबाहेर काढलं होतं. पण त्याला नंतर पुन्हा एंट्रीही देण्यात आली होती. त्याचप्रमाणे पाचव्या सीझनमध्ये पूजा मिश्राला सिद्धार्थ भारद्वाजबरोबर भांडणं केल्यानं शोमधून काढलं होतं.