मुंबई, 02 जानेवारी: टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मा च्या आत्महत्येनंतर सगळ्यानाच धक्का बसला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंड शिझान खान ला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात दाखल करण्यात आलं असून शिझानची कोठडी 14 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान मी निर्दोष असल्याचं शिझाननं सांगितलं आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं त्यानं म्हटलं आहे. शिझान आणि तुनिषा यांच्या ब्रेकअपमुळे तुनिषानं आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं. शिझानबरोबर असलेल्या नात्यामुळे तुनिषा नैराश्यात गेल्यानं तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे मात्र या प्रकरणाला आता नवं वळणं मिळण्याची शक्यता आहे. कारण शिझानच्या कुटुंबियांनी दोघांचा ब्रेकअपच झालेला नाही असं मोठं विधान केलं आहे. या विधानानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिझानच्या कोर्टातील सुनावणीनंतर त्यांच्या कुटुंबियांनी प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांची बाजू सर्वांसमोर मांडली. यावेळी शिझानच्या बहिणीनं तुनिषाच्या मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याचप्रमाणे तुनिषाचे आई वडीलच तिचा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप देखील तिनं केला. तुनिषा तिच्या घरच्या प्रकरणामुळे बऱ्याच काळापासून नैराश्यात होती आणि आता तिच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप तिनं केला आहे. हेही वाचा - Sheezan Khan : शिझानच्या बहिणींनी तुनिषाच्या आईबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाल्या ‘त्या जबरदस्तीने…
त्याचप्रमाणे प्रेस कॉन्फरन्समध्ये मीडियाकडून शिझान आणि तुनिषा यांचा ब्रेकअप झाला होता की नाही या प्रश्नानं जोर धरला होता. तेव्हा शिझानच्या कुटुंबियांनी सांगितलं, ‘50 वेळा सांगून झालं आहे की दोघांचा ब्रेकअप झालेला नाही’. कुटुंबियांनी केलेल्या या विधानानंतर हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
याआधी तुनिषाच्या आईनं प्रेस कॉन्फरन्स घेत शिझान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. शिझाननं तुनिषाबरोबर लग्न करण्यासाठी तिला धर्म बदलण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे त्याची बहिण तुनिषाला घेऊन दर्ग्यात गेली होती, असं म्हणाली. परंतु तुनिषाच्या आईचे सगळे आरोप फेटाळून लावत शिझानच्या बहिणीनं तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केलेत.