जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sheezhan Khan : 'मी निर्दोष आहे आणि...'; तुनिषा शर्मा प्रकरणावर शीझान खानचं वक्तव्य

Sheezhan Khan : 'मी निर्दोष आहे आणि...'; तुनिषा शर्मा प्रकरणावर शीझान खानचं वक्तव्य

शीझान खान

शीझान खान

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. तेव्हापासून सर्वत्र एकच खळबळ उडाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 जानेवारी : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. तेव्हापासून सर्वत्र एकच खळबळ उडाली. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात अभिनेता शीझान खान ला ताब्यात घेण्यात आलं असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुनिषा प्रकरणी रोज नवी माहिती समोर येत असून प्रकरणाला नवं वळण मिळत आहे. अशातच शीझान खानने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी त्याच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. वकीलांनी शीझानच्या वतीने सांगितलं, “वसई, कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खानने त्याच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती. त्यादरम्यान, माध्यमांसमोर बोलताना अभिनेता म्हणाला होता की, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तो निर्दोष आहे, ‘सत्यमेव जयते…’ हेही वाचा -  Sheezan Khan : …तर शीझानही उचलेल टोकाचं पाऊल, वकिलांनी दिली खळबळजनक माहिती आज सोमवारी शीझानचे वकील मिश्रा न्यायालयात खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहेत. 28 वर्षीय अभिनेता शीझान खानला कोर्टात हजर करण्यात आले. त्याचवेळी शीझानच्या वतीने वकिलाने तुरुंगात त्याचे इनहेलर आणण्याची मागणी केली होती, त्याशिवाय त्याने घरचे जेवण मागवण्याची परवानगीही दिली होती. इतकंच नाही तर अभिनेत्याच्या वकिलाने तुरुंगात केस कापू नयेत असंही त्याच्यावतीने सांगितलं होतं. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या आईने शीझानवर अनेक गंभीर आरोप केले. एवढेच नाहीतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शीझानला शिक्षा करण्याची मागणी केली. हळूहळू शीझान खानमुळे तुनिषा शर्मा तिच्या आईपासूनही दूर जाऊ लागली.’ असा खुलासा तुनिषाच्या आईने केला आहे. शिझानने तिला लग्नाचं वचन  दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता. तसेच त्याच्या बहिणीने तुनिषाला दर्ग्यातही नेले होते.’ तुनिषाच्या आईने केलेल्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, दरम्यान, तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी अली बाबा दास्तान-ए-काबुल या टीव्ही शोच्या सेटवर गळफास लावून आपला जीव दिला होता. यानंतर 25 डिसेंबर रोजी पोलिसांनी शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली. तुनिषाची आई वनिता यांनी शीझान विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात