Home /News /entertainment /

सैफ-करिनाच्या लग्नात खूश नव्हत्या शर्मिला टागोर, हे होतं कारण

सैफ-करिनाच्या लग्नात खूश नव्हत्या शर्मिला टागोर, हे होतं कारण

अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) दुसऱ्या लग्नात आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या अजिबात उत्साही नव्हत्या. यामागचं कारण सैफ अली खानचे वडील मन्सूल अली खान असल्याचं शर्मिला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत.

  मुंबई, 27 एप्रिल : आपल्या मुलाच्या लग्नात कोणतीही आई ही आनंदी आणि उत्साही असते यात काही शंका नाही. पण अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) दुसऱ्या लग्नात आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या अजिबात उत्साही नव्हत्या. यामागचं कारण सैफ अली खानचे वडील मन्सूल अली खान असल्याचं शर्मिला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत. 2012 साली अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena  Kapoor Khan) यांनी विवाह केला होता. या विवाहानंतर अनेकजण चकीत झाले होते. दोन मुलांचा पिता असलेल्या सैफशी करिनाने लग्न केल्यानंतर तिलाही अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. याशिवाय सैफची आई अभिनेत्री शर्मिला टागोर या देखील मुलाच्या लग्नासाठी उत्साही नव्हत्या. सैफ आणि करिनाच्या लग्नाच्या एक वर्ष आधी सैफचे वडील मन्सूर अली खान (Mansoor Ali Khan)  यांचं निधन झालं होतं. एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी सांगितलं, की त्या या लग्नासाठी अजिबात उत्सुक नव्हत्या. आपण लग्नासाठी घालण्याच्या कपड्यांविषयी देखील काहीच ठरवलं नव्हत. एक जुनीच साडी आपण नेसली होती असही त्यांनी सांगितलं.

  (वाचा - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'बबिता'चा ग्लॅमरस अंदाज; PHOTO सोशल मीडियावर व्हायरल)

  लग्नातही तुमचा उत्साह कमी होता असा प्रश्न विचारल्यानंतर शर्मिला यांनी सांगितलं, “जर मी उत्साहीत दिसत नसेल तर, माझ्या पतीला जावून एक वर्ष पण झालं नाही. हा आनंदाचा क्षण आहे आणि कुटुंबातील सगळेच फार खूष आहेत.” 2011 साली पतौडी खानदानासाठी एक वाईट गोष्ट घडली होती. शर्मिला टागोर यांच्यासाठी हा अत्यंत वाईट काळ होता. करिना कपूर देखील त्यावेळी तिथे उपस्थित होती. करिनाच्या वाढदिवसाच्या एक दिवसांनंतर सप्टेंबर 2011 मध्ये मन्सूर अली खान यांनी जगाचा निरोप घेतला होता.
  करिना आणि सैफ नुकतेच दुसऱ्यांदा आई बाबा बनले आहेत. करिना आता जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood News, Kareena Kapoor, Saif Ali Khan

  पुढील बातम्या