'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बबिता म्हणजेच अभिनेत्री मूनमून दत्ता ही तिच्या अभिनयाइतकीच लुक्स साठीही फेमस आहे. मूनमून दत्ताने ऑफशोल्डर ड्रेसमध्ये तिचा एक फोटो शेअर केला असून त्याला अनेक चाहत्यांची पसंती मिळते आहे. मूनमून तिच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. नेहमीच तिचे हटके लूक पाहायला मिळतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेव्यतिरिक्त मूनमून काही चित्रपटांतही दिसली होती. समुद्रकिनाऱ्यावरील या फोटोत मूनमून फारच मोहक दिसत आहे. मूनमूनच्या म्हणजेच 'बबिता'च्या सौदर्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'जेठालाल' तिच्या प्रेमात पडतो. हे पात्र अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेव्यतिरिक्त मूनमून मुंबई एक्सप्रेस, हॉलिडे, ढिंचॅक एन्टरप्राइज या चित्रपटांत दिसली होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'बबिता' या भूमिकेमुळे मूनमूनला खरी ओळख मिळाली. मूनमून तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फारच सक्रिय असते. सतत निरनिराळे फोटो ती पोस्ट करत असते. शिमरिंग गाऊनमध्ये मूनमूनचा ग्लॅमरस लूक... 2004 साली आलेल्या 'हम सब बाराती' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होत.