मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shalin Bhanot: एक्स पत्नीच्या लग्नादिवशी मंदिरात पोहचला शालीन; सांगितलं लग्नाला न जाण्यामागचं कारण

Shalin Bhanot: एक्स पत्नीच्या लग्नादिवशी मंदिरात पोहचला शालीन; सांगितलं लग्नाला न जाण्यामागचं कारण

शालिन भनौत

शालिन भनौत

आज अखेर शालिन भनौतची माजी पत्नी दलजितने दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यानंतर आता त्यावर शालिनची प्रतिक्रिया समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च : 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होत शालिन भनौत प्रचंड चर्चेत आला होता. या शोमध्ये तो टॉप 4 मध्ये पोहोचला होता. शालिनसोबतच त्याची एक्स पत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौरसुद्धा प्रचंड चर्चेत आली होती. शालिन बिग बॉसच्या घरात असतानाच त्याच्या एक्स पत्नी दलजीत कौरने ती दुसरं लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. तिच्या या घोषणेमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. आज अखेर दलजितने दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यानंतर आता त्यावर शालिनची प्रतिक्रिया समोर येत आहे.

बिग बॉस 16 फेम शालिन भनौतची माजी पत्नी आणि 'छोटी सरदारनी' फेम टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्री तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होती. दलजीत कौरने निखिल पटेलसोबत लग्न केलं आहे. या लग्नाला दलजीतचे कलाकार मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. निखिलचंही हे दुसरं लग्न असून त्याला आधीच दोन मुलीदेखील आहेत.  लग्नानंतर दलजीत आपल्या मुलासह केनियाला शिफ्ट होणार आहे.

अखेर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली दलजित कौर; दोन मुलींच्या वडिलांसोबत थाटतेय नवा संसार

शालीन भानोतची माजी पत्नी दलजीत कौरने धूमधडाक्यात दुसरं लग्न केलं आहे. लग्नानंतर ती परदेशात शिफ्ट होणार आहे. अशा वेळी सर्व चाहते शालीन भानोतच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. शालीनने यापूर्वी असेही म्हटले होते की, तो दलजीत कौरच्या लग्नामुळे खूप खूश आहे आणि तो तिच्या लग्नाला नक्कीच उपस्थित राहणार आहे. मात्र तो लग्नाला पोहोचला नाही. पण तो यावेळी एका मंदिरात दर्शनासाठी आलेला दिसला. यावेळी मीडियाला सामोरं जात दलजितच्या दुसऱ्या लग्नाविषयी भाष्य  केलं आहे.

आपल्या माजी पत्नीच्या लग्नादिवशी शालीन मंदिरात देवदर्शनासाठी आला होता. यावेळी त्याला दलजितच्या लग्नाविषयी त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा त्याने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. तो म्हणाला, 'या क्षणी माझं काम अधिक महत्वाचं आहे. ते तुम्ही पाहा.' मंदिरात येण्याचं कारण सांगत तो म्हणाला कि, 'त्याचा बेकाबू हा नवीन शो आजपासून सुरु होत आहे. जेव्हाही एखादा नवीन शो सुरु होत असतो तेव्हा तो देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतो असं त्याने सांगितलं आहे.

शालीन भानोत सलमान खानच्या होस्टेड रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये दिसला होता. बिग बॉस मध्येच असताना त्याला रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 13 ची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ती ऑफर नाकारली. शालीन टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने 'सात फेरे: सलोनी का सफर', 'कुलवधू', 'गृहस्थी', 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'सान्या' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याने त्याची माजी पत्नी दलजीत कौरसोबत 'नच बलिए 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

First published:

Tags: Bigg Boss 16, Tv actor, Tv actress