मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Dalljiet Kaur: आधी गुडघ्यावर बसून प्रपोज केलं अन् मग भररस्त्यात किस...; शालीन भानोतच्या एक्स बायकोचा व्हिडीओ व्हायरल

Dalljiet Kaur: आधी गुडघ्यावर बसून प्रपोज केलं अन् मग भररस्त्यात किस...; शालीन भानोतच्या एक्स बायकोचा व्हिडीओ व्हायरल

दलजीत कौर

दलजीत कौर

शालिन भानोतची माजी पत्नी अभिनेत्री दलजीत कौर लवकरच निखिल पटेलसोबत बोहल्यावर चढणार आहे. या दोघांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. त्याआधी दलजीतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 मार्च : बिग बॉस 16 फेम शालिन भानोतची माजी पत्नी आणि 'छोटी सरदारनी' फेम टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. दलजीत कौर मार्च 2023 मध्ये निखिल पटेलसोबत लग्न करणार आहे. निखिलचंही हे दुसरं लग्न असून त्याला आधीच दोन मुलीदेखील आहेत.  लग्नानंतर दलजीत आपल्या मुलासह केनियाला शिफ्ट होणार आहे. या दोघांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. त्याआधी दलजीतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे.

शालीन भानोत बिग बॉसमध्ये असताना या वर्षाच्या सुरुवातीला दिलजीतने निखिलसोबत एंगेजमेंट करत दुसऱ्या लग्नाची घोषणा केली होती. दलजीतच्या दुसऱ्या लग्नावर शालिनने आनंद व्यक्त करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. आता दलजीतच्या दुसऱ्या लग्नाला काहीच दिवस बाकी आहेत. लवकरच ही  अभिनेत्री निखिल पटेलसोबत बोहल्यावर चढणार आहे. नुकतंच तिने या दोघांचा एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. ज्यामध्ये निखिलने तिला कसं प्रपोज केलं हे दिसतंय.

Swara Bhaskar Wedding: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले स्वरा आणि फहाद; अभिनेत्रीच्या हळदीचे सुंदर फोटो आले समोर

अभिनेत्री दलजीत कौरच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये निखिल पटेल आपल्या भावी पत्नीला प्रपोज करण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. नेपाळच्या मध्ये त्याने दलजीतला प्रपोज केले. दोघेही जण तिथे एकत्र फिरायला गेले होते. दरम्यान, चांगली संधी पाहून निखिल पटेलने गुडघ्यावर बसून अभिनेत्री दलजीत कौरला रोमँटिक प्रपोज केले होते. नेपाळच्या रस्त्यांवर अचानक मिळालेल्या प्रपोजलमुळे दलजीत आनंदी झाली आणि तिने निखिलला किस केलं असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दलजीत तिचा होणार नवरा निखिल पटेलसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहे. यासोबतच  तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर प्री-ब्राइडल शॉवरचे काही फोटोही शेअर केले आहेत.त्यामुळे नवीन आयुष्यासाठी दलजीत खूपच उत्सुक आणि आनंदी असल्याचं दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

शालीन आणि दलजीत कौरने डिसेंबर 2009 मध्ये लग्न केले होते पण 2016 मध्ये ते वेगळे झाले. शालिन भानोतने नुकत्याच एका मुलाखतीत दलजीतच्या या निर्णयावर तो खूप आनंदी असल्याचं सांगितलं आहे. याविषयी तो म्हणाला की, “मला अजून तिला भेटायचे आहे आणि तिच्याशी बोलायचे आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे.'पुढे तो म्हणाला कि, 'लोकांनी आयुष्यात पुढे जाणे आवश्यक आहे, सगळ्यांनी जीवनाला आणखी एक संधी दिली पाहिजे. काही ऍडजस्टमेंट करणे आवश्यक आहे आणि ते ठीक आहे.' अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

First published:
top videos

    Tags: Bigg Boss 16, Entertainment, Tv actress