मुंबई, 24 फेब्रुवारी: बिग बॉसचा यंदाचा सोळावा सीझन तुफान गाजला. यावेळी घरात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यातील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. त्यातीलच टॉप ५ मधील एक नाव म्हणजे शालिन भानोत . आता बिग बॉस संपून अनेक दिवस उलटले असले तरी हे स्पर्धक मात्र कायम चर्चेत राहतात. शालिन भानोत बिग बॉस 16 च्या घरातील गाजलेला स्पर्धक आहे. शेवट्पर्यंत तो चांगला खेळाला.पण तो या घरात असतानाच त्याच्या माजी बायकोने दुसऱ्या लग्नाची घोषणा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ती लग्नानंतर मुलासोबत दुसऱ्या देशात स्थायिक होणार आहे. यावर शालिनने प्रतिक्रिया दिली होती. आता त्याच्या मुलाची प्रतिकिया समोर आली आहे. शालिन भानोतची माजी पत्नी आणि ‘छोटी सरदारनी’ फेम टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने जेव्हा तिने तिच्या मुलाला तिच्या भावी पती निखिल पटेलसोबत लग्नाबद्दल सांगितले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले आहे. Naseeruddin Shah: ‘मुघलांचं योगदान कोणी नाकारू शकत…’ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचं वादग्रस्त वक्तव्य दलजीत कौर मार्च 2023 मध्ये निखिल पटेलसोबत लग्न करणार आहे. निखिलचंही हे दुसरं लग्न असून त्याला आधीच दोन मुलीदेखील आहेत. लग्नानंतर दलजीत आपल्या मुलासह केनियाला शिफ्ट होणार आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत दलजीतने जेव्हा तिने आपल्या मुलाला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं आहे. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘जेडेन निखिलला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने आपोआपच त्याला पापा म्हटले. मी याआधी अनेक लोकांना भेटले होते, पण त्याच्यासोबतचा कम्फर्ट झोन वेगळा होता."
दलजीत पुढे म्हणाली, ‘जेडेन केनियाला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो सर्वांना सांगतो की ‘माझे वडील आहेत आणि ते माझ्यासाठी खुप काही करणार आहेत.’ तो खूप उत्साहित आहे. परंतु त्याला हे देखील समजते की त्याचे अजून एक दुसरे वडील आहेत (शालीन भानोत). मात्र, आता त्याला असे वाटते की कोणीतरी आपल्यासोबत असावे. जेव्हा आई कामावर असेल तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी आता घरी कोणीतरी असेल. यामुळे तो खूप आनंदी आहे." असं ती म्हणाली.
शालीन आणि दलजीत कौरने डिसेंबर 2009 मध्ये लग्न केले होते पण 2016 मध्ये ते वेगळे झाले. शालिन भानोतने नुकत्याच एका मुलाखतीत दलजीतच्या या निर्णयावर तो खूप आनंदी असल्याचं सांगितलं आहे. याविषयी तो म्हणाला की, “मला अजून तिला भेटायचे आहे आणि तिच्याशी बोलायचे आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे.‘पुढे तो म्हणाला कि, ‘लोकांनी आयुष्यात पुढे जाणे आवश्यक आहे, सगळ्यांनी जीवनाला आणखी एक संधी दिली पाहिजे. काही ऍडजस्टमेंट करणे आवश्यक आहे आणि ते ठीक आहे.’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.