मुंबई, 24 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या दमदार अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. नसीरुद्दीन शाह स्पष्टवक्ते आहेत. ते त्यांचं मत ठामपणे मांडतात. चाहत्यांकडून अनेकदा त्यांना समर्थन मिळतं तर अनेकदा विरोधाचा सामना देखील करावा लागतो. नुकतंच नसीरुद्दीन शाह यांनी असंच वक्तव्य केलं आहे ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच एका मुलाखतीत या अभिनेत्याने मुघल भारतावर राज्य करत होते त्याविषयी आपलं मत मांडलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी नुकतेच मुघलांबाबत वक्तव्य केले आहे. आजकाल शाह ZEE5 च्या वेब सीरिज ‘ताज - डिवाइडेड बाय ब्लड’ साठी चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी राजा अकबराची भूमिका साकारली आहे. ही वेब सिरीज मुघलांच्या राजवटीतील राजे आणि सम्राटांच्या आयुष्यावर आधारित आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी मुघलांचा अपमान करू नये, असे शाह यांनी म्हटले आहे. Pooja Bhatt: आलिया भट्टच्या बहिणीने वडिलांसोबतच केलेलं असं काही; ‘त्या’ फोटोनं माजली होती खळबळ द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शाह यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी शाह यांना विचारण्यात आले की, या देशामध्ये मुघलांविषयी फार चांगले मत नाही त्याकडे तुम्ही कसं पाहता. यावर उत्तर देताना शाह म्हणाले, ‘‘हे खूप मजेदार आहे. म्हणजे, लोक अकबर आणि नादिरशाह किंवा बाबरचा पणजोबा तैमूरसारखा खुनी आक्रमक यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत." शाह पुढे म्हणाले, ‘‘मुघल इथे लुटायला आले नव्हते. या देशाला आपले घर बनवण्यासाठी ते येथे आले आणि त्यांनी तेच केले. त्यांचे योगदान कोण नाकारू शकेल?"
याच मुलाखतीत बोलताना शाह म्हणाले, ‘‘मुघल फक्त वाईटच होते असा विचार करणे देशाच्या इतिहासाची कमतरता दर्शवते. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात भारताच्या स्वदेशी संस्कृतीपेक्षा मुघलांचा जास्त गौरव करण्यात आला असेलही, परंतु इतिहासातील त्यांचा काळ विनाशकारी म्हणून दाखवला जाऊ नये." शाह म्हणाले की, ‘‘आपल्या स्वदेशी परंपरांपेक्षा मुघलांचा गौरव करण्यात आला आहे. कदाचित ते खरे असेल पण त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघल साम्राज्य इतके वाईट होते तर त्याला विरोध करणारे त्यांनी बांधलेली स्मारके का पाडत नाहीत.’’
शहा म्हणाले, ‘‘त्यांनी जी स्मारके बांधली आहेत. त्यांनी जे काही केले ते वाईट असेल तर ताजमहाल पाडा, लाल किल्ला पाडा, कुतुबमिनार पाडा. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, तो मुघलांनी बांधला होता. आपल्याला त्याचा गौरव करण्याची गरज नाही, परंतु आपल्याला त्याची बदनामी करण्याचीही गरज नाही.’’ असे मत शाह यांनी व्यक्त केले आहे. नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केलेल्या या मतावर वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी व्यक्त केलेलं हे मत काही जणांना पटलं आहे तर काही जण त्याच्या विरोध करत आहेत.