मुंबई, 21 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण च्या बेशरम रंग या गाण्यामुळे नवा वाद निर्माण झाला. गाण्यात दीपिका घातलेल्या नारंगी बिकीनीमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप हिंदू महासभेनं केला. त्यानंतर पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर चांगलेच ताशेरे ओढले. देशात अनेक ठिकाणी पठाण सिनेमा विरोधात निदर्शने करण्यात आली. शाहरूख खानचे पुतळे आणि बॅनर्स जाळण्यात आले. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अयोध्याचे तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास यांना शाहरूखला कापून टाकेन असं वक्तव्य केलं आहे. संत महंत परमहंस दास यांनी सोशल मीडिया एक व्हिडीओ शेअर केलाय. पठाण सिनेमात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा सिनेमा लव्ह जिहाद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘संपूर्ण प्लानिंग करून सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणून या सिनेमाच्या विरोधात शाहरुखचे पोस्टर जाळले आहेत. पण तो ज्या दिवशी जिवंत भेटेल त्या दिवशी त्याला जिवंत जाळीन’. हेही वाचा - Pathaan: बेशरम रंग गाण्याच्या विवादात पठाणमधील दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लुक आला समोर परमहंस दास पुढे यांनी पुढे म्हटलं, ‘ती त्याला शोधतोय, ज्या दिवशी मला तो जिहादी सापडेल मी त्याची कातडी सोलून त्याला जिवंत जाळून टाकीन. माझी अनेक माणसं मुंबईत त्याचा शोध घेत आहेत. तसंच आणखी तीन लोकांची नावं मी त्यांना दिली आहेत. एकच शाहरूख खान आहे. त्याशिवाज सलमान खान आणि आमिर खानही आहे ज्यांना फाशीची दिली आहे. तो पहिला भेटेल त्याला जिवंत जाळावे. मी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेन’.
पठाण सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. मात्र सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज होताच शाहरूख आणि दीपिका टिकेचे धनी बनले आहेत. दीपिकानं घातलेल्या बिकीनीवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पठाण सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. शाहरूख आणि दीपिका यांनी मात्र सुरू असलेल्या टीकांवर आणि ट्रोलिंगवर गप्प बसणंच शहाणपणाचं मानलं आहे.