आदिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थच्या प्रेमात असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
सिद्धार्थने नुकताच पांढऱ्या स्वेटशर्टमधला एक फोटो पोस्ट केला. विशेष म्हणजे काही काळापूर्वी अदितीनेही याच स्वेटशर्टमधला फोटो शेअर केला होता.
सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला, तेव्हा चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्यात अदितीच्या कमेंटनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं. ‘इन्स्टाग्रामवर ईदचा चंद्र’ अशी कमेंट तिने केली.
सिद्धार्थ आणि अदिती हे ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं.
अदितीच्या वाढदिवशी त्याने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. ‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशा शब्दांत त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या.