जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nora Fatehi : फिफाच्या स्टेजवर नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर

Nora Fatehi : फिफाच्या स्टेजवर नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर

 नोरा फतेही

नोरा फतेही

तिरंगा उलटा फडकावल्याने नोरा वादात सापडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 02 डिसेंबर :**प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही  सध्या कतारमध्ये चालू असलेल्या  फिफा विश्वचषक २०२२ साठी चर्चेत आहे. तिथे आपल्या नृत्याचा जलवा दाखवणाऱ्या  नोरा फतेहीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिथे नृत्याविष्कार सादर करत नोराने भारतीयांचच नाही तर जगभरातील प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिने तिथे देशाचं नाव मोठं केलं असं म्हणत एकीकडे नेटकरी तिचं कौतुक करत असताना तिचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे नोरा फतेहीवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण यावेळी तिच्याकडून एक चूक झाली. ज्यामुळे नेटकरी तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. नोरा तिच्या दमदार डान्स परफॉर्मन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे देश-विदेशात चर्चेत आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे, तिला कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. नोराने या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करताना आनंदाच्या भरात  चुकीच्या पद्धतीने तिरंगा पकडला होता. तसेच त्यानंतर तिने तिरंगा स्वतःवर गुंडाळला आणि ज्या पद्धतीने त्याने तिरंगा परत केला, त्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिरंगा उलटा फडकावल्याने नोरा वादात सापडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. हेही वाचा - Nora Fatehi :नोराने पहिल्यांदा सांगितली ब्रेकअप स्टोरी; त्याच्या आठवणीत स्टेजवरच ढसाढसा रडली व्हिडिओमध्ये नोरा म्हणताना ऐकू येते की, ‘भारत फिफा वर्ल्ड कपचा भाग नसला तरी आम्ही या महोत्सवाचा एक भाग आहोत. आमच्या संगीतातून, नृत्यातून. नोराच्या या शब्दांनी तिथे उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारला. त्यावेळी तिथले लोक इतके उत्तेजित होतात की ते हुल्लडबाजी करू लागतात. नोराने तिथे जय हिंदच्या घोषणा दिल्या, नोरासोबत उपस्थित लोकांनीही घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण स्टेडियम भारत, भारताच्या घोषणांनी दणाणू लागले.

जाहिरात

त्यादरम्यान नोरा फतेहीने तिरंगा उलट दिशेने म्हणजे हिरव्या रंग सर्वात वर असलेल्या दिशेने पकडला होता. एवढंच नाही तर तिरंगा उचलत असतानाही चुकीच्या पद्धतीने उचलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे आणि त्यानंतर तिने तो एका व्यक्तीच्या दिशेने फेकलेला दिसत आहे. प्रकरण इथेच थांबले नाही तर नोराने तिरंगा उलटा फडकावला. त्याने तिरंगा स्कार्फसारखा स्वतःभोवती गुंडाळला.  नोराचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी त्यावरून तिच्यावर टीका केली आहे. नेटकऱ्यांनी नोरावर राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने उचलणे, उलटा पकडणे आणि नंतर फेकून त्याचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नोराच्या या कृतीवर सोशल मीडियावर यूजर्स तिला खूप फटकारत आहेत. एका यूजरने लिहिले - तिरंगा चुकीचा पकडला गेला आहे. दुसऱ्याने लिहिले - तिरंगा अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आला. हा तिरंग्याचा अपमान आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, नोराला तिरंग्याचा आदर माहित नाही. नोराने तिरंग्याचा अपमान केला. युजर म्हणतो की त्याने तिरंगा फडकावला नसावा. हा तिरंग्याचा अनादर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात