मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /2 दिवसात Pathaanची अनपेक्षित कमाई; काश्मीर खोऱ्यातील थिएटर्स 32 वर्षांनी झाले हाऊसफुल्ल

2 दिवसात Pathaanची अनपेक्षित कमाई; काश्मीर खोऱ्यातील थिएटर्स 32 वर्षांनी झाले हाऊसफुल्ल

pathaan

pathaan

काश्मीरच्या खोऱ्यातही शाहरुखचा पठाण पोहोचला आहे. दोन दिवसात सिनेमात अनपेक्षित कमाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं पठाण मधून 4 वर्षांनी दमदार कमबॅक केलं आहे. पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झालाय. सिनेमाला प्रेक्षकांच्या उत्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. सिनेमानं अँडवान्स बुकींग करत पहिल्याच दिवशी थिएटर हाऊसफुल्ल केले. सिनेमानं दुसऱ्याच दिवशी 70 कोटींची लक्षवेधी कमाई केली आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात हा नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. तसंच संपूर्ण देशभरात सिनेमा प्रदर्शित झालाय. काश्मीरमध्येही पठाणनं वेगळा इतिहास रचला आहे असं म्हणायला हरकत नाही. पठाण रिलीज होताच तब्बल  32 वर्षांनी काश्मीर घाटीतील थिएटर्सवर हाऊसफुल्लची पाटी झळकली आहे.

देशभरात पठाणला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पहिल्याच दिवशी सिनेमा 25 कोटींची कमाई केली. काश्मीच्या घाटीत पठाण सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. 32 वर्षांनी इथले थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत. मल्टीप्लेक्स चेन असलेल्या INOX Leisure Ltdनं ट्विट करत ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - Pathaan Movie: शाहरुख खानचा 'पठाण' रिलीजच्या पहिल्याच दिवशी लिक; या वेबसाईट्सवर दिसतोय सिनेमा

INOXनं ट्विट करत  म्हटलंय, 'आज पठाणची क्रेझ देशभर पाहायला मिळत आहे. तब्बल 32 वर्षांनी काश्मीर खोऱ्यातील थिएटर्समध्ये हाऊसफुल्लची पाटी परत आणल्याबद्दल आम्ही किंग खानचे आभारी आहोत. थँक यू शाहरुख'.

25 जानेवारीला पठाण रिलीज झाला आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी पब्लिक हॉलिडे असल्यानं प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात आपला मोर्चा पठाणकडे वळवल्याचं पाहायला मिळालं. सिनेमानं दुसऱ्या दिवशी 70 कोटींचं कलेक्शन केल्यानं सिनेमाचं दोन दिवसांचं एकूण कलेक्शनचा आकडा हा 127 कोटींवर गेला आहे. एका दिवसात 50 कोटींचा आकडा मोडून थेट 70 कोटींचा आकडा गाठवणारा हिंदीतील पठाण हा पहिलाच सिनेमा ठरला आहे.

फिल्म क्रिटिक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत पठाणनं नॅशनल चेन असलेल्या PVR मध्ये 13.75 कोटी, INOX 11.65 , CINEPOLIS 6.20 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशीचं एकूण कलेक्शन हे 31.60 कोटी इतकं होतं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News