मुंबई, 04 नोव्हेंबर- बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या क्यूट अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. सध्या साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ‘केदारनाथ’ फेम अभिनेत्री छायाचित्रकारांपासून स्वतःला वाचवत पळताना दिसते. दरम्यान, सारा सध्या तिच्या आगामी ‘कुली नंबर वन’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून सलॉनसाठी वेळ काढला. या दरम्यान फोटोग्राफरच्या गराड्यात ती अडकली पण त्यातही सर्वांच्या मधून तिने हळूच हसत पळ काढला. छायाचित्रकारांनी साराला आवाज दिल्यावर तिने मागे वळून पाहिले आणि स्मितहास्य दिले. तिचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात साराने ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा ड्रेस घातला आहे. छायाचित्रकार योगेन शहाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला. साराचे चाहते या व्हिडीओवर तुफान कमेन्ट करत आहेत.
आयफा 2019 मध्ये सारा अली खानला ‘केदारनाथ’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणचा पुरस्कार मिळाला होता. सध्या सारा अभिनेता वरुण धवनसोबत ‘कुली नंबर वन’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याशिवाय ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘लव आजकल 2’ सिनेमातही दिसणार आहे. स्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात जेव्हा हा बॉलिवूड स्टार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना फाइव्ह स्टारमध्ये घेऊन जातो शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो

)







